लोकमत ऑनलाईनबोरद, दि़ 26 : उपक्रमशील गाव अशी ओळख निर्माण केलेल्या मोड ता़ तळोदा येथे रविवारी मोड ग्रामपंचायतीअंतर्गत पहिली विवाह नोंद करण्यात आली़ या विवाह सोहळ्याला लोकप्रतिनिधींसह अधिकारी वर्गही उपस्थित होत़ेवधु-वरांनी विवाह नोंद करावी यासाठी शासनाकडून मोठय़ा प्रमाणात प्रयत्न केले जात असतात़ याचाच आदर्श घेत मोड येथील दिलीप चौधरी यांची कन्या सुचिता व शहादा येथील सुरेश पाटील यांचे चिरंजीव प्रेमराज यांचा लगअसोहळा मोड येथे रविवारी पार पडला़ या विवाह सोहळ्याचे वैशिष्टये म्हणजे मोड ग्रामपंचायतीतर्फे लगअमंडपातच वधु-वराच्या हाती विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र देत या नवीन उपक्रमाला सुरुवात करण्यात आली़या विवाह सोहळ्याला आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार उदेसिंग पाडवी, शहादा नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, तळोदा नगराध्यक्ष अजय परदेशी, मोडचे सरपंच जयसिंग माळी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावीत, जिल्हाधिकारी डॉ़ मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधिक्षक डॉ़ संजय पाटील, अखिल भारतीय गुजर समाज अध्यक्ष दीपक पाटील,भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य शशिकांत वाणी, पीपल्स एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण माळी, विश्वनाथ कलाल आदी उपस्थित होत़े प्रत्येक वधू-वरांनी आपली विवाह नोंद करणे गरजेचे असल्याचे मत मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आल़े
मंडपातच वर-वधुच्या हाती विवाह नोंदणी प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 1:01 PM