n लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : पिंपराण, ता.नवापूर येथे वन विभागाने टाकलेल्या धाडीत सागवानी लाकडासह दोन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तालुक्यातील पिंपराण, खोच्यापाडा येथील योहान प्रभू गावीत यांच्या शेतातील घरात अवैधरित्या लाकूड साठवण व कारखाना सुरू असल्याची गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाचे वनक्षेत्रपाल आर डी पवार व प्रथमेश हाडपे यांनी छापा टाकत कारवाई केली. शेतात अवैध रित्या रंधा मशीन व चिरकाम केलेला साग माल अस्ताव्यस्त अवस्थेत शेतात आंबाच्या झाडाजवळ माल दिसून आला. सदर माल जप्त करून नवापुर वन विभागाच्या आगार पंचनामा करून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात साग नग २७५ , एक पलंग , एक रंधा मशीन इलेक्ट्रीक मोटारसह, एक डिझाईन मशीन इलेक्ट्रीक मोटारसह एकूण दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अंदाजे १.२५ घनमीटर लाकूड जप्त केले आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा , विभागीय दक्षता अधिकारी धुळे,सहायक वनसंरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा, यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल चिंचपाडा रेंज स्टाफ ,नवापूर रेंज स्टाफ, नंदुरबार रेंज स्टाफ ,खांडबारा रेंज स्टाफ , यांनी कारवाई केली.
पिपंराण येथे सागवानी लाकडासह साहित्य जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 12:07 PM