नंदुरबार,दि.2- रस्त्यातच प्रसुती झालेल्या महिलेचा जिल्हा रुग्णालयात उपचार घेतांना मृत्यू झाल्याची घटना 1 एप्रिल रोजी रात्री साठेआठ वाजता घडली.
मनिषा संतोष ठाकरे (24) रा.खतगव्हाण, ता.कुकरमुंडा असे मयत महिलेचे नाव आहे. नंदुरबार तालुक्यातील व्याहूर येथून जिल्हा रुग्णालयात ही महिला प्रसुतीसाठी येत होती. रस्त्यातच तिला असह्य प्रसुती कळा झाल्याने ती नंदुरबारपासून अलीकडे काही अंतरावर प्रसुती झाली. तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार घेतांना मनिषा ठाकरे या महिलेचा मृत्यू झाला.