शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
5
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
6
"मविआ नेत्यांकडून जनतेची दिशाभूल", नागपुरात देवेंद्र फडणवीस यांची प्रचार रॅली
7
५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
8
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
9
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
10
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
11
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
12
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
13
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
14
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
15
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
17
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
18
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
19
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!

शहादा येथे प्रशासन व मौलानांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 12:33 PM

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : बकरी ईद हा सण साध्या पद्धतीने व सोशल डिस्टंन्सिंगसह इतर नियमांचे पालन करून साजरा ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : बकरी ईद हा सण साध्या पद्धतीने व सोशल डिस्टंन्सिंगसह इतर नियमांचे पालन करून साजरा करण्यात यावा. यासाठी शहादा शहरातील सर्व मशिदींचे मौलाना व सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या आवारात घेण्यात आली.बैठकीला प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती पोडभिते, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, प्रभारी तहसीलदार डॉ.उल्हास देवरे, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.राहूल वाघ, पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील आदी उपस्थित होते. प्रांताधिकारी डॉ.गिरासे म्हणाले की, कोरोना विषाणूच्या संसर्गापासून नागरिकांची सुरक्षितता व्हावी म्हणून मुस्लीम समाजाने बकरी ईद सण हा साध्या पद्धतीने साजरा करावा. गेल्या चार महिन्यात आलेले विविध सण-उत्सव जसे साध्या पद्धतीने साजरे केले त्याचे पालन आताही व्हावे. गेल्या चार महिन्यात मुस्लीम बांधवांनी मशिदीत न जाता घरी नमाज अदा करीत आहेत. त्याच अनुषंगाने येणाऱ्या सण-उत्सवांनाही घरीच नजाम अदा करावी, असे आवाहन केले. शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पदभार घेतलेल्या तृप्ती पोडभिते यांनीही सोशल डिस्टन्सिंगसह कोरोनाला रोखण्यासाठी असलेल्या नियमांचे पालन करून बकरी ईद साजरी करण्याचे आवाहन केले. या वेळी हाजी अल्ताफ मेमन, प्रा.लियाकत सैयद, डॉ.खलील अहमद, नगरसेवक वसीम तेली, अ‍ॅड.साजिद हाफिज, शमसुद्दीन, साजीद मन्सुरी, मौलवी साजिद जुबेर अन्सारी यांच्यासह शहरातील सर्व मशिदींचे मौलाना, शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते.