लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : पुरातन काळातील अप्रितम लेण्यांपैकी दरा फाटय़ानजीक गोमाई नदीच्या पात्रात मध्यभागी असलेल्या पांडव लेण्यांचे दोन सभा मंडपापैकी एक सभा मंडप नदीला आलेल्या पुरात वाहून गेला.जिल्हाभरात सुरू असलेल्या पावसामुळे गावे जलमय होऊन नदी-नाल्यांना महापूर आले होते. शहादा तालुक्यातील दरा फाटानजीक गोमाई नदी वाहते. या नदीत खाली उतरले की काही पुरातन शिल्प दिसतात. पाच मूर्ती कोरलेल्या असून हे शिल्प इ.स.1700 शतकाच्या असल्याचे सांगितले जाते. या मूर्ती अखंड काळ्या पाषाणात कोरलेल्या आहेत. ही शिल्प नदीच्या पात्रात आहेत. तिथे साधारण 15 मीटर अंतरावर दोन वेगवेगळे सभा मंडप होते. हे सभा मंडप सपाटीपासून 10 ते 12 मीटर खाली नदीच्या पात्रात उभारण्यात आले आहेत. जेव्हा नदीला पाणी नसते तेव्हा ते चांगल्या पद्धतीने बघू पाहता येतात. पहिला सभा मंडप नदीच्या मध्यभागी आहे. त्यात दोन खोल्या बांधल्या असून पहिल्या खोलीत पाच मूर्ती आहेत आणि मुख्य खोलीत भगवान महावीर यांची एक मूर्ती आहे. त्या मूर्तीच्या आजूबाजूला ही दोन मूर्ती आहेत. या मुख्य खोलीत साधारण फक्त दोनच व्यक्ती उभे राहू शकतात पण दुस:या खोलीत अनेक जण उभे राहू शकतात. या दोन्ही सभामंडपांपैकी एक सभा मंडप पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे.
4परिसरात घरांच्या झालेल्या नुकसानीचे महसूल विभागामार्फत पंचनामे करण्यात येत आहेत. संततधार आणि भिज पावसाने ग्रामीण भागातील अनेक घराच्या भिंती व घराचे छत पडून संसार उघडय़ावर आले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सर्वत्र नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करण्यात येत आहे. ब्राrाणपुरी येथे पडझड झालेल्या घरांचे पंचनामे तलाठी स्मिता पाटील, ग्रामविकास अधिकारी गोपाळ पाटील हे करीत आहेत. यावेळी सरपंच वंदनाबाई मोरे, उपसरपंच माधवराव पहाडा पाटील, पोलीस पाटील रवींद्र पवार, कोतवाल भारत नेवरे, कैलास बिरारे आदी उपस्थित होते.