लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहादा ते जयनगर रस्त्यावरील मोहिदे ते सोनवद दरम्यान वनविभागाच्या हद्दीत नवीन वीज मीटर बेवारस स्थितीत आढळून आले. वीज कंपनीच्या कर्मचा:यांनी हे मीटर येथून उचलले असून याबाबत चौकशी करण्याची मागणी होत आहे.तालुक्यातील मोहिदेतर्फे शहादे गावाच्या पूर्वेस वनविभागाच्या हद्दीत काटेरी बाभळींमध्ये मोठय़ा प्रमाणावर नवे वीज मीटर फेकून दिल्याचे आढळून आले. ही घटना जागरुक नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या अधिका:यांना कळवूनही सुरुवातीला टाळाटाळ केली. मात्र नंतर घटनेचे गांभीर्य लक्षात आल्यावर विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचा:यांनी घटनास्थळी येऊन वीज मीटर इतरत्र हलवले. या वेळी उपस्थित असलेले मोहिदे त.श. ग्रामपंचायतीचे सदस्य ईश्वर महिरे यांनी या घटनेची चौकशी करावी, अशी मागणी वरिष्ठांकडे केली. कारण मोहिदे त.श. गावातील अनेक नागरिकांनी वीज वितरण कंपनीकडे वीज जोडणीसाठी अर्ज केले आहेत. मात्र वीज मीटर नसल्याचे कारण सांगत आजर्पयत विद्युत जोडणी दिलेली नाही. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर वीज मीटर काटेरी वनात फेकून दिल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हे मीटर खाजगी ठेकेदारांना बसवण्यासाठी दिले होते का? वीज वितरण कंपनीने याबाबत खुलासा करणे गरजेचे आहे. तसेच मीटर जर चोरीला गेले असतील तर पोलिसात फिर्याद दिली होती का? पोलिसात फिर्याद दिली असेल तर वीज वितरण कर्मचा:यांनी वीज मीटर परस्पर का नेले? वीज वितरण कंपनीच्या भांडारगृहात आवक-जावकवरून सिरीयल क्रमांक असलेले ते मीटर कुणाला दिले होते? खाजगी ठेकेदाराला का? की कर्मचा:यांना? खाजगी ठेकेदाराने वीज मीटर बसविण्यात कामचुकारपणा तर केला नाही ना? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून याबाबत चौकशी करण्याची मागणी घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी केली.
मोहिदे गावाजवळ बेवारस स्थितीत मीटर आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:43 PM