लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उद्योग विभागाने मायक्रो प्लॅनिंग करून जिल्ह्यात जास्तीत जास्त उद्योगधंदे कसे येतील यादृष्टीने प्रय} करावा अशा सुचना जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी अधिका:यांच्या बैठकीत बोलतांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी वान्मती सी., तळोद्याचे तुषार दुडी, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, वनसंरक्षक केवटे, उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे उपस्थित होते. सर्व विभाग प्रमुखांकडून त्यांनी माहिती जाणून घेतली. त्यांनी सांगितले, प्रत्येक शाळा स्वच्छ असली पाहिजे. त्यात पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, रॅम्पची सुविधा, रंगरंगोटी चांगली पाहिजे. शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे. शाळाबाह्य मुलांना संबधीत विभागांनी मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रय} करण्याचे त्यांनी सांगितले.जिल्ह्यात उद्योगधंदे वाढीसाठी वाव आहे. त्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राने मायक्रो प्लॅनिंग करून उद्योजकांना आकर्षीत करण्यासाठी प्रय} करावा. मिरची व कापूस पिकावर आधारीत उद्योगधंदे उभारणीसाठी प्रय} व्हावा असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील दुर्गम भागातील गाव, पाडय़ांर्पयत वीजेची स्थिती कशी आहे. किती गावांना वीज पुरवठा बाकी आहे याची माहिती जाणून घेत त्यांनी प्रत्येक गाव, पाडय़ार्पयत वीज पोहचावी यासाठी प्रय} झाला पाहिजे असेही त्यांनी सांगितले. सौर उज्रेचा पर्याय देखील ठेवावा असेही त्यांनी सांगितले. याशिवाय त्यांनी आरोग्य, कृषी, जलयुक्त शिवार, उद्योग, महिला व बालकल्याण, विद्युत, आदिवासी विकास विभाग, जिल्हा परिषद यासह इतर सर्व विभागांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी मंजुळे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने झालेली तयारी, सोपविलेली कामे, त्याची अंमलबजावणी आणि तयारी याचाही आढावा घेतला.ुजिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी पदभार घेतल्यानंतर जिल्ह्याची माहिती करून घेतली. त्यानंतर त्यांनी गुरुवारी सायंकाळी उशीरा सर्व विभागांची एकत्र संयुक्त बैठक घेतली. सर्व विभागांकडून माहिती जाणून घेत, योजनांची अंमलबजावणीची माहिती घेत त्यांनी मार्गदर्शन केले. रोजगार, शिक्षण, आरोग्य यांना प्राधान्य देण्याचे त्यांनी सांगितले. लोकांना सहज उपलब्ध व्हा, कामे करा व लोकाभिमुख प्रशासन द्या असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
नंदुरबार जिल्ह्यात उद्योगधंदे वाढीसाठी मायक्रो प्लॅनिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 4:53 PM