लहान शहादे : यंदा जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळी स्थिती निर्माण झालेली आह़े त्यामुळे साहजिकच रोजगाराच्या शोधात सिमावर्ती भागातील मजुरांचे मोठय़ा संख्येने स्थलांतर सुरु झाले आह़ेऐरवी मजुरांचे स्थलांतर हे दस:या नंतर अधिक होत असत़े परंतु जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झालेली असल्याने आतापासून मजुरांचे स्थलांतर होणे ही चिंतेची बाब मानली जात आह़े नंदुरबार तालुक्यातील लहान शहादे, कोळदे, शिंदे, बामडोद, भागसरी, समशेरपूर, पळाशी, लोणखेडा, पथराई, धमडाई आदी गावातील मजुरांचे दरवर्षी गुजरात राज्यात उसतोडणीसाठी शेकडो कुटुंबिय स्थलांतरीत होत असतात़ मात्र या वर्षी जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आह़े पाणी नसल्याने या परिसरातील शेतशिवारे ओस पडलेली आहेत़ हाताला काम नसल्याने येथे राहून अनेक कुटुंबियांवर उपास मारीची वेळ आलेली आह़े स्थानिक पातळीवर साधारणत: दोन महिन्यांपासून येथील शेतमजूरांच्या हाताला काम नाही़ त्यामुळे साहजिकच परराज्यात जात मिळेल ते काम करत कुटुंबियांचा चरितार्थ भागवण्यासाठी मजुरांकडून धावपळ करण्यात येत आह़े येथील अनेक कुटुंबिय ट्रक्टर, ऑटो रिक्षा, पिकअप तसेच मिळेल त्या वाहनाने तात्पुरते स्थलांरित होत आहेत़ दरम्यान, गुजरातेत यंदा ब:यापैकी पाऊस झाल्याने या ठिकाणी शेतीव्दारे निर्माण होणा:या रोजगाराला वाव आह़े त्यामुळे या ठिकाणीच मजुरांचे मोठय़ा संख्येने स्थलांतर होत असत़े मजुरांचे स्थलांतर हा जिल्ह्यातील महत्वाचा व गंभीर विषय आह़े त्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देत उपाय योजना करण्याची मागणी आह़े जिल्ह्यातून दरवर्षी मोठय़ा संख्येने स्थानिक मजुर रोजगाराच्या शोधात स्थलांतरीत होत असतात़
दुष्काळी स्थितीमुळे नंदुरबारात मजुरांचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 11:51 AM