शहादा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात आज दुपारी एक वाजून 24 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले शहरातील सोनार गल्ली भागात अचानक मोठा आवाज झाल्याने व्यावसायिकांसह परिसरातील नागरिक घरातून बाहेर रस्त्यावर आले होते. तालुक्यातील सावळदा येथील भूकंपमापन केंद्रात भूकंपाची नोंद झाली असून सुमारे 3.2 रिश्टर स्केलचा धक्का आहे.
शहरापासून सुमारे शंभर ते सव्वाशे किलोमीटर दूर असलेल्या मध्यप्रदेशातील गावात हे भूकंपाचे केंद्र असल्याची माहिती सावळदा येथील भूकंपमापन केंद्राने दिले आहे. या धक्क्यामुळे कुठे नुकसान झाले नसले तरी दिवसभर प्रशासनाला ग्रामीण भागातील नागरिकांचे फोन येत असल्याची माहिती तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांनी दिली.