लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : आरोग्य विभागाच्या वतीने विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेअंतर्गत येत्या 2 डिसेंबर रोजी शहादा तालुक्यातील प्रत्येक खेडोपाडी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात शहादा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र पेंढारकर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. ही मोहीम दर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात सुरू राहणार आहे.बैठकीला वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहन पटेल, सर्व तालुका आरोग्य सहायक व तालुका पर्यवेक्षक तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. इंद्रधनुष्य-2 मोहिमेसाठी राज्यातील 25 जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यात नंदुरबार जिल्हाचीही निवड करण्यात आली आहे. यापूर्वी केंद्र सरकारने राष्टीय स्तरावरून मोहीम राबविली होती. या मोहिमेनंतर केलेल्या सर्वेक्षणात शहरी भागातील पूर्ण लसीकरणाचे काम ग्रामीण भागाच्या तुलनेत कमी आढळल्याने दिसून आले. त्यामुळे लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी मोहीम पुन्हा सुरू करण्यात येत आहे. आरोग्य विभागातर्फे या मोहिमेबाबत कार्यशाळा घेण्यात आली. या वेळी लसीकरण सनियंत्रण दिलीप पावरा, आरोग्य विस्तार अधिकारी संजय चौधरी, आरोग्य सेवक गणेश लोहारे, सर्व आरोग्य कर्मचारी, सर्व पर्यवेक्षक, परिचारिका उपस्थित होते. जनजागृतीसाठी आशा कार्यकर्ती, आरोग्य परिचारिका व वैद्यकीय अधिका:यांमार्फत बाह्य लसीकरण सत्रसंस्थास्तरीय लसीकरण सत्र, ओपीडी, नियमित गृहभेटी आदींच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जागृती केली जाईल, अशी माहिती डॉ.राजेंद्र पेंढारकर यांनी दिली. नियोजन 38 तर एकूण मोबाईल सत्र 64 अशा एकूण 102 सत्राचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात पात्र लाभार्थीची एकूण संख्या गरोदर माता 138 तर 0 ते 2 वयोगटातील एक हजार 68 लाभार्थीचा सर्वे करण्यात आला आहे.मोहिमेचे उद्दिष्टनियमित लसीकरणपासून वंचित राहिलेले बालक व गर्भवती महिलांना 10 गंभीर आजारापासून वाचविण्यासाठी मिशन इंद्रधनुष्य ही मोहीम राबविण्यात येणार आहे. दोन वर्षाखालील मुलांचा व गरोदर मातांचा तसेच विविध रोगांपासून लसीकरणाच्या माध्यमातून बचाव करणे हा मोहिमेचा मुख्य हेतू आहे. लसीकरण केल्यास क्षयरोग, कावीळ, गोवर रुबेला, घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलिओ, देवी, हिमोफेलिया व इन्फ्लुएझा आदी आजारांपासून मुक्ती मिळते.उद्दिष्टपूर्तीसाठी प्रशासन सज्जकेंद्र शासनातर्फे मिशन इंद्रधनुष्य मोहिमेचे ठरविण्यात आलेले उद्दिष्ट व लसीकरण 100 टक्के करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत शहादा तालुक्यातील संपूर्ण भागातील नियमित लसीकरणाबरोबरच वंचित लाभार्थीचा शोध, स्थलांतरित झोपडपट्टय़ा, बांधकामाच्या ठिकाणी, भटक्या जमाती, खेडोपाडी माहिती देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे.
गंभीर आजारांपासून मुक्ती देणार ‘मिशन इंद्रधनुष्य’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2019 12:48 PM