लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मुलांच्या क्रिकेट खेळाच्या वादातून जमावाने महिला आणि मुलावर चाल करून ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना करजकुपा, ता.नंदुरबार येथे ११ रोजी घडली. याप्रकरणी तब्बल २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.करजकुपार येथे मुलांचा क्रिकेट खेळ सुरू होता. त्यात वाद झाल्याने मुलाची आई गायत्री धनंजय पाटील या तेथे गेल्या. त्याचा राग येवून जमावाने गायत्री पाटील व त्यांच्यासोबतच्या एकाला शिविगाळ करून ठार मारण्याची धकमी दिली. याबाबत गायंत्री पाटील यांच्या फिर्यादीवरून दशरथ नरोत्तम चौधरी, भरत नरोत्तम चौधरी, विपूल भरत चौधरी, घन:शाम पाटील, राधेशाम पाटील, बुद्धर गोपाळ पाटील, नरेंद्र राजाराम पाटील, भुपेंद्र रमेश पाटील, दामू पुनाजी पाटील, एकनाथ नरसई पाटील, उज्वल दिलीप पाटील, डाया उद्धव पाटील, कुणाल नरेंद्र पाटील, राजाराम नरोत्तम पाटील, आशा भरत चौधरी, देवकन्या नरेंद्र पाटील, करुणा राजाराम पाटील, गिता घन:शाम पाटील, भावना राजेंद्र चौधरी, दर्शना डाया पाटील, रंजना दशरथ पाटील व कैलास नरोत्तम चौधरी यांच्याविरुद्ध जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जमावाची महिलेस शिविगाळ व धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 11:56 AM