लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातून मोटारसायकल चोरी करून गावातच अज्ञात ठिकाणी लपवत डिक्कीमधील मोबाईल चोरून पोबारा करणा:या चोरटय़ाचा प्रय} तालुक्यातील खेडदिगर येथील जागरूक युवकांमुळे फसला. त्या चोराकडून मोबाईल व मोटारसायकल जप्त करण्यात आली.याबाबत मिळालेली माहिती अशी की, नांदरखेडा येथील सुरेश मक्कन पाटील हे शहादा येथे मोटारसायकलीने (क्रमाक एम.एच.39- 0419) कामानिमित्त आले होते. त्यांनी मोटारसायकल डॉ.टाटीया यांच्या कार्यालयाजवळ उभी करून डिक्कीतच मोबाईल ठेवून भाजीमंडईत गेले. तेथून परत आल्यानंतर मोटारसायकल चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी शोधाशोध केली असता मोटारसायकल मिळाली नाही. ही घटना त्यांनी सामाजिक कार्यकर्ते गिरीश पाटील यांना सांगितली. त्यांनी डिक्कीतील मोबाईल नंबर डायल केले असता लोकेशन खेड व खेतिया परिसरात मिळत होते. पाटील यांनी खेडदिगर येथील काही जागरूक युवकांना ही माहिती दिली. त्यांनी खेतिया येथील मोबाईल दुकानदारांना ही माहिती दिली. दरम्यान, महेश उत्तम पावरा (रा.बहिरपूर, ता.शहादा) हा मोबाईल विकण्यासाठी आल्याचे एका दुकानदाराने त्या युवकांना सांगितले. त्यांनी तात्काळ दुकानावर धाव घेत पावरा यास पकडून खेडदिगर येथे आणले. त्यानंतर गिरीश पाटील यांना चोराला खेडदिगर येथे पकडून ठेवल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्या चोरास ताब्यात घेत शहादा येथे आणले. पोलिसी खाक्या दाखवताच महेश पावरा याने चोरलेला मोबाईल काढून देत लपवलेली मोटारसायकलही ताब्यात दिली. खेडदिगर येथील जागरूक युवकामुळे दोन तासातच मोटारसायकल चोर जेरबंद झाला. सुरेश पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटय़ाविरोधात गुन्हा दाखल झाला असून तपास स्वप्नील गोसावी करीत आहेत.
मोबाईल व मोटारसायकल चोर शहाद्यात जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 12:46 PM