लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लहान मुलांच्या भांडणातून मेहतर वस्तीत जमावाने दगडफेक करून दहशत निर्माण केली. यात दोनजण किरकोळ जखमी झाले. जमावाविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मेहतर वस्तीत परेश भरवाड व बिल्ला नामक व्यक्तीची लहान मुलांच्या भांडणातून वादावादी झाली. बिल्ला याने त्याच्या गटातील 20 ते 25 युवकांना जमा करून मेहतर वस्तीत दहशत निर्माण केली. दगडफेक करीत परेश भरवाड व इतरांना जखमी केले. तातडीने पोलीस घटनास्थळी पोहचल्याने पुढील अनर्थ टळला. याबाबत परेश राणाभाई भरवाड यांनी फिर्याद दिल्याने 20 ते 25 जणांच्या जमाविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक साळुंके करीत आहे.
लहान मुलांच्या भांडणाच्या वादातून जमावाची दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:07 PM