रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ‘देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माङया चहाचे कौतुक केले, त्यातच माझा चार दशकातील श्रमाचे सार्थक झाले आहे. आता माङया चहाची चर्चाच सुरू झाली आहे तर पंतप्रधान साहेबांनी मला रेल्वेस्थानकावर चहा विक्रीचे लायसन द्यावे, एवढीच हात जोडून विनंती आहे.’ ही प्रतिक्रिया आहे येथील चार दशकांपासून रेल्वेत चहा विक्री करणा:या रामदास चौधरी या वृद्ध विक्रेत्याची.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यातच नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य सेविकांशी व्हीडीओ कॉन्फरन्सने चर्चा करताना नंदुरबारच्या चौधरी चहाचा उल्लेख केला होता. तेव्हापासून येथील चौधरी गल्लीत राहणारे रामदास चौधरी हे चर्चेत आले. शुक्रवारी पुन्हा पंतप्रधानांनी शिर्डी येथे घरकूल वाटपाच्या कार्यक्रमात नंदुरबारच्या लाभाथ्र्याशी व्हीडीओ कान्फरन्सने संपर्क साधताना चौधरी चहाचे कौतुक केल्याने या चर्चेत अधिकच भर पडली आहे.नंदुरबारमधील चौधरी गल्लीत रामदास चैत्राम चौधरी हे 70 वर्षीय वृद्ध राहतात. गेल्या 41 वर्षापासून ते रेल्वेत चहा विक्रीचा व्यवसाय करतात. रोज पहाटे साडेपाच वाजता घरुन चहाचे कॅन भरुन नंदुरबार स्थानकावरून हावडा एक्सप्रेसने सुरतकडे जातात. रेल्वेतच ‘चौधरी चहा’च्या नावाने चहा विक्री करतात. प्रवासीदेखील त्यांच्या चहाची प्रतीक्षाच करीत असतात. दुपारी तीन वाजता ते पुन्हा रेल्वेत चहा विक्री करीतच सुरतहून नंदुरबारला परततात. हा त्यांचा नित्याचा उपक्रम. या फेरीत किमान 40 लीटर चहाची विक्री ते करतात.गेल्या महिन्यातच दूरदर्शनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौधरी चहाचे जाहीरपणे कौतुक केले होते. तेव्हापासून रामदास चौधरी हे चर्चेत आलेले व्यक्तिमत्व. अतिशय साधे व्यक्तिमत्व, त्यांचा मिशा या लक्षवेधी आहेत. अनेकवेळा रेल्वेत ते ‘मूछवाले चौधरी की चाय’ या नावानेही चहा विक्री करतात. शुक्रवारी पंतप्रधानांनी पुन्हा त्यांच्या चहाचे कौतुक केल्याने महाराष्ट्रातच नव्हे तर आता देशभरात चौधरी चहा चर्चेची झाली आहे. या पाश्र्वभूमीवर त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, साधारणत: 25-30 वर्षापूर्वी आपण मोदीसाहेबांना नंदुरबार स्थानकावर चहा दिल्याचे आठवते. तेव्हाची आठवण आजही त्यांना असल्याने आपण धन्य झालो. खरेतर या व्यवसायात गेल्या 40 वर्षात आपल्याला काहीच मिळाले नाही. केवळ दोनवेळची गुजराण होते तेवढेच. चहा विक्रीतून दोन पैसे हाती लागतात पण अनेकवेळा निम्मे रक्कम दंड भरण्यातच जाते. आता मोदीसाहेबांनी माङया चहाचे कौतुक केले आहे. हा व्यवसाय आपण सुरू ठेवणारच पण आपल्यानंतर मुलगाही तो चालवणार. माङो तर आयुष्य गेले पण मुलासाठी तरी पंतप्रधानांनी रेल्वेस्थानकावर चहा विक्रीसाठी लायसन दिले किंवा पेन्ट्रीकारमध्ये परवाना दिला तर त्यांचे आपण कायम ऋणी राहू, असे त्यांनी सांगितले.रामदास चौधरी यांचे दोन मुले, पत्नी, सुना असा परिवार आहे. त्यापैकी एक मुलगा सुरेश हा त्यांना या व्यवसायासाठी मदत करतो. त्यांच्यासकट एक रोजंदारी मजूर त्यांनी लावला आहे. पहाटे चार वाजता उठून घरी ते स्वत:च चहा बनवतात. त्यांच्या चहाची चव एकच राहिली आहे. त्याच्यात दूध, साखर, चहाचे प्रमाण एकसारखे ठेवले आहे. त्यात मसालादेखील ते स्वत: बनवतात. त्याचेही प्रमाण चार दशकांपासून सारखेच ठेवले आहे. या कामात त्यांना त्यांची पत्नी मदत करते.
मोदीसाहेब चहा आवडला, आता लायसनही द्या..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 1:00 PM