लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पश्चिम रेल्वेच्या डीआरएम यांनी नंदुरबार स्थानकातील नुतनीकरण कामांची पहाणी करून विविध सुचना केल्या. दरम्यान, त्यांच्या पहाणीच्या वेळीच रेल्वे ट्रॅकवर मोकाट जनावरे फिरत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. भाजप व रेल्वे सल्लागार समिती तर्फे त्यांना विविध मागण्यांचे निवेदन देखील देण्यात आले.डीआरएम सत्यकुमार यांनी बुधवारी रेल्वे स्थानकात भेट दिली. त्यांनी नुतनीकरण कामाची पहाणी केली. दोन्ही फ्लॅटफार्मवर जावून रेल्वेरूळ आणि इतर बाबींची तपासणी केली. त्यांच्या पहाणीच्या वेळी दोन नंबरच्या फ्लॅटफार्मवर मोकाट जनावरे दिसून आले. ट्रॅकवरच ते फिरतांना दिसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.याबाबत उपाययोजना करण्याच्या सुचना देखील त्यांनी यावेळी संबधित अधिकाऱ्यांना केल्या. तेथे असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाशी संवाद साधून त्यांनी प्रवासी सेवा संदर्भात जाणून घेतले.यावेळी त्यांना भाजपतर्फे निवेदन देण्यात आले. जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, माणिक माळी, केतन रघुवंशी निलेश माळी आदी उपस्थित होते. रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य जवाहरलाल जैन यांनी देखील निवेदन दिले. दिलेल्या निवेदनांमध्ये आणखी एक पादचारी पूल तयार करावा. खान्देश एक्सप्रेस दररोज असावी, सुरतकडे जाणाºया गाड्यांमधील व्हीआयपी कोटा वाढवावा. पुण्यासाठी रेल्वे सुरू करावी. फ्लॅटफार्म शेडची लांबी वाढवावी. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वयंचलित जिना बसवावा यासह इतर मागण्यांचा त्यात समावेश आहे.
डीआरएम पहाणीवेळीच ट्रॅकवर फिरले मोकाट गुरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2019 12:10 PM