ऑनलाईन लोकमतरांझणी, दि़ 22 : तळोदा तालुक्यातील रांझणी, प्रतापपूरसह लगतच्या परिसरात लागवड करण्यात आलेल्या टरबूज पिकावर मावा तसेच फुलकिडचा प्रादुर्भाव झाला आह़े त्यामुळे शेतक:यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़ेसततचे वातावरण बदल तसेच ढगाळ हवामानामुळे या ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याचा अंदाज शेतक:यांकडून वर्तविण्यात येत आह़े रोगाच्या प्रादुर्भावामुळे पानातील रस शोषला जाऊन त्यामुळे पाने वाकडी होत आह़े तसेच हे किटक विषाणूजन्य रोगाचाही प्रसार करीत असल्याने शेतक:यांकडून किटकनाशकांची फवारणी करण्यात येत आह़े टरबूज पिकाला उष्ण, भरपूर सूर्यप्रकाश तसेच कोरडे हवामानाची आवश्यकता असत़े परंतु परिसरात गेल्या काही दिवसांपासून सतत हवामान बदलत असल्याने टरबूज पिकावर दुष्परिणाम होत असतो़ दरम्यान, टरबूजवर मावा व फुलकिडचा प्रादुर्भाव झाल्याने कृषी विभागाकडून संबंधित परिसराची पाहणी करण्यात आली आह़े शेतक:यांना विविध उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात येत आह़ेपरिसरातील शेतक:यांकडून 15 डिसेंबर ते 15 जानेवारीदरम्यान टरबूज पिकाची लागवड मोठय़ा संख्येने करण्यात आली होती़ येथील टरबूज पिकाला जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरसुध्दा चांगला बाजारभाव मिळत असतो़ त्यामुळे येथील शेतकरी मोठय़ा संख्येने हे पिक घेत असतो़पोषक वातावरणाची गरज.टरबूज पिकाला साधारणत 22 ते 25 अंश सेल्सिअस तापमान उपयुक्त ठरत असत़े मध्यंतरीच्या काळात वातावरणातील गारठा व ढगाळ हवामान यामुळे पिकाला काहीसा फटका बसत असल्याचे दिसून येत आह़े तळोदा तालुक्यातील रांझणी, प्रतापपूर, रोझवा पुनर्वसन या पट्टयात टरबूज व खरबूजचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेण्यात येत असत़े या शिवाय येथील शेतकरी या पिकातूनच भरघोस उत्पन्नही मिळवत असतात़ त्यामुळे शेतक:यांची सर्व आर्थिक गणित या पिकावर अवलंबून असत़े उन्हाळ्यात टरबूजातूनाच मोठा आर्थिक फायदा शेतक:यांना मिळत असत़े परंतु मावा व फुलकिडमुळे टरबूजाचा दर्जा खालावत असल्याचे दिसून येत असत़े शिवाय फुलकिडमुळे लगतच्या टरबूज पिकालादेखील याची लागन होत असल्याने चांगले पिकदेखील या रोगापासून प्रभावित होत असल्याचे टरबूज उत्पादकांकडून सांगण्यात येत आह़े येत्या काही दिवसात पोषक वातावरण निर्माण होऊन टरबूज पिक जगाव अशी आशा शेतक:यांना वाटत आह़े
टरबूजावर मावा,फुलकिडचा प्रादुर्भाव : तळोदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 1:19 PM