लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 12 : बोरकुंड सेल्टीपाडा ता़ अक्कलकुवा येथे 42 वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करत मारहाण करण्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली़ या प्रकरणी चौघे संशयितांविरोधात गुन्हा दाखल आह़े बोरकुंड येथील 42 वर्षीय महिलेसोबत शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास चंद्रसिंग राज्य तडवी, राजा नोकटा तडवी, पाल्या नामटा तडवी, खुमानसिंग मोत्या तडवी सर्व रा़ बोरकुंड सेल्टीपाडा यांनी जुन्या भानगडीची कुरापत काढून वाद घातला़ यादरम्यान चौघा संशयितांनी महिलेच्या घरात घुसून तोडफोड करत मारहाण केली़ यावेळी त्यांनी महिलेजवळील दोन हजार 700 रूपये रोख चोरून नेल़े तसेच महिलेचा शिविगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी देत, विनयभंग केला़ याप्रकरणी शनिवारी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात पिडित महिलेच्या फिर्यादीवरून चंद्रसिंग तडवी, राजा तडवी, पाल्या तडवी व खुमानसिंग तडवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े पिडित महिला दुर्गम भागातून पायपीट करत मुख्य मार्गार्पयत आल्याचे व तेथून अक्कलकुवा येथेर्पयत आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आल़े
मारहाण करून महिलेचा विनयभंग : बोरकुंड सेल्टीपाडा येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 11:27 AM