कुठल्याच नाण्यावर बंदी नाही
रिझर्व्ह बँकेने २००९ मध्ये १० रुपयांची नाणी चलनात आणली. सध्या १४ प्रकारची नाणी चलनात असून, त्यापैकी कुठल्याच नाण्यावर अद्याप बंदी लादण्यात आलेली नाही, असे ‘आरबीआय’ने यापूर्वी अनेकवेळा स्पष्ट करून नागरिकांच्या मोबाईलवर यासंदर्भात जनजागृतीपर संदेशही पाठविले. असे असताना जिल्ह्यातील बहुतांश व्यावसायिकांकडून १० रुपयांची नाणी स्वीकारण्यास नकार दिला जात असल्याचे दिसून येत आहे.
कोणती नाणी नाकारतात
ग्रामीण भागात जर कोणी व्यावसायिक ग्राहकाला ५० ते १०० रुपयांची जर १० रुपयांची नाणी दिली तर ग्राहक घेण्यास नकार देत असल्याचे दुकानदाराकडून सांगण्यात आले.
बँकांमध्येही नाण्याच्या मोठा साठा
तालुक्यातील व्यावसायिकांकडून ग्राहक नाणे घेण्यास धजावत असल्याने व्यावसायिक बँकांकडे धाव घेत असून, नाण्यांचा साठा स्टेट बँक ऑफ इंडिया शहादा शाखेत जमा करण्यात येत असतो.
रिझर्व्ह बँकेकडून चलनात आणलेले १० रुपयांचे नाणे बंद झालेले नाही. यासंदर्भात यापूर्वीही अनेकवेळा जनजागृती केली; मात्र बाजारपेठेत नाणी स्वीकारण्यास नकार का दिला जातोय, हे कळेनासे झाले आहे. १० रुपयांच्या नोटच्या तुलनेत नाण्याचे आयुष्यमान कितीतरी पटीने अधिक आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी मनात कुठलेही किंतु-परंतु न ठेवता नाणी स्वीकारायला हवी.
मनोज पेढेकर, व्यवस्थापक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ब्राह्मणपुरी
दहा रुपयांची नाणी खूप कमी प्रमाणात ग्राहक आणत असून, जे नाणी आणतात ती घेतली जातात. ग्राहकांच्या मनात नाण्यांसंदर्भात अनेक गैरसमज असून, नाण्यांवर वेगवेगळ्या डिझाईन असल्याने नकली तर नाही ना नाही? असे बोलले जात असल्याने नाहक त्रास सहन करावा लागतो.
- भरत गोराणे, दुकानदार, ब्राह्मणपुरी, ता. शहादा
बँकेकडून ग्राहकांना नाणी देण्यात येतात. मात्र, बँक दहा रुपयांची नाणी घेत नाही. मग बँक ही नाणी का देतात. जर दहा रुपयांची नाणी बँकेत जमा करायला गेलो तर बँक अधिक शुल्क घेत असून, आम्हाला भुर्दंड भरावा लागतो.
- कमलेश तावडे, ब्राह्मणपुरी