लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत नाशिक येथील विभागीय मुल्यमापन समितीने जिल्ह्यातील कोठली खु.ता.नंदुरबार ,लहान कडवान, ता.नवापुर व पुरुषोत्तमनगर, ता. शहादा या ग्रामपंचायतींना भेट देऊन तेथील स्वच्छतेविषयक कामांची पाहणी केली.जिल्ह्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत २०१८-१९ या वर्षात प्रथम आलेल्या कोठली खु. ता. नंदुरबार व द्वीतीय (विभागून ) क्रमांक आलेल्या लहान कडवान ता. नवापुर व पुरुषोत्तमनगर ता. शहादा या ग्रामपंचायतीची विभागस्तरावरुन तपासणी करण्यात येत आहे. त्यानुसार गुरुवार ५ रोजी नाशिक विभागाचे उपायुक्त अरविंद मोरे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कोठली खु., लहान कडवान व पुरुषोत्तमनगर ता. शहादा या ग्रामपंचायतींना भेटी दिल्या. पाहणी प्रसंगी समितीत सहाय्यक आयुक्त मनिष सांगळे, सहाय्यक अधिक्षक अभियंता प्रल्हाद बिराजदार, सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांचा समावेश होता.ग्रामपंचायतीअंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता, वैयक्तिक शौचालय बांधकाम व वापर, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाबाबत राबविण्यात आलेले उपक्रमांची पाहणी केली. ग्रामस्थांशी स्वच्छतेबाबत संवाद साधला. शाळा, अंगणवाडी यांना भेटी दिल्या. लहान कडवान ता. नवापुर येथे प्राथमिक शाळेत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची पाहणी केली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, बीडीओ अशोक पटाईत, नंदकुमार वाळेकर, सी. टी. गोस्वामी, दिनेश वळवी, गोसावी, दिनेश मोवळे, सरपंच वासंतीबाई विलास वळवी, गोविंद गावीत, ज्योतिबेन पाटील, आर. डी. पवार, अर्चना वसावे, शरद पाटील आदी उपस्थित होते.
अभियान विभागीय समितीकडून पहाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2019 12:09 PM