भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जूननंतर मान्सूनच्या सरींवर अवलंबून असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात कधीकाळी जून ते ऑक्टोबर असा पाच महिन्यांचा कालखंड पावसाळा म्हणून गणला जाई़ परंतू गेल्या 10 वर्षात जिल्ह्यात सरासरी 60 दिवस पाऊस होत असून यामुळे येथील सर्वच घटकांवर प्रभाव पडून पर्यावरणाला धोका निर्माण होत आह़े जून, जुलै ते सप्टेंबर आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर अखेर अशी पावसाची मोजणी केली जात़े साधारण 90 ते 120 दिवस पाऊस राज्यातील विविध भागात कोसळत असताना नंदुरबार जिल्ह्यात मात्र गत 5 वर्ष 38 ते 58 दिवस पाऊस कोसळला आह़े या पावसामुळे भूजल पातळी, जलप्रकल्प, शेती यांना सर्वाधिक फटका बसून येथील नागरिक जलसंकटास सामोरे जात आहेत़ 2005 नंतर कमी अधिक प्रमाणात कोसळलेल्या पावसाची सरासरी वाढवण्यासाठी वृक्ष लागवड, जलयुक्त सारखे उपक्रम राबवले असले तरी त्यातून पाऊस मात्र वाढला नाही़ जिल्ह्यात तीनच तालुक्यात 2015 नंतर 60 मिलीमीटरपेक्षा अधिक अशा पाऊस फक्त सरासरी चार दिवस कोसळला आह़े2018 हे वर्ष पावसाच्या दृष्टीने सर्वाधिक भीषण असे वर्ष ठरले आह़े या वर्षात केवळ 48 दिवस पाऊस झाला होता़ तर तब्बल 78 दिवस हे कोरडे होत़े दिवसाला सर्वसाधारण 2़5 मिलीमीटर पाऊसही या कोरडय़ा दिवसात झालेला नव्हता़ यात सर्वाधिक विशेष बाब म्हणून 18 ऑगस्ट रोजी नवापूर तालुक्यात 144़2, धडगाव तालुक्यात 68़8, 21 जुलै रोजी अक्कलकुवा तालुक्यात 74 मिलीमीटर पावसाची नोंद आह़े याव्यतिरिक्त अक्कलकुवा तालुक्यात 22 मार्च रोजी 115 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आह़े 2018 या वर्षात केवळ चारच दिवस 65 मिलीमीटरपेक्षा अधिक असा मुसळधार पाऊस झाला होता़ जून ते सप्टेंबर यादरम्यान घेतल्या गेलेल्या नोंदीनुसार सर्वाधिक गंभीर स्थित नंदुरबार तालुक्यात होती़ 91 दिवस तालुक्यात पावसाचा थेंब कोसळलेला नव्हता़ गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात पावसाचे खंड सातत्याने वाढले आहेत़ 2014 मध्ये 50 दिवस, 2015 मध्ये 36, 2016 मध्ये 58 तर 2017 मध्ये 67 दिवस जिल्ह्यात पाऊस कोसळलेला नाही़ 2016 मध्ये नवापूर तालुक्यात 2 दिवस, तळोदा तालुक्यात 2 आणि धडगाव तालुक्यात 1 दिवस 60 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला़
4नंदुरबार तालुक्यात गेल्यावर्षी केवळ 38 दिवस पावसाचे होत़े आलेला हा पाऊस 50 मिलीमीटरपेक्षा कमीच होता़नवापूर तालुक्यात 43 दिवस पावसाचे होत़े येथे 641 मिलीमीटर पाऊस झाला़ यात केवळ एका दिवस 144 मिलीमीटर पाऊस झाला़शहादा तालुक्यात 28 दिवस पाऊस कोसळला़ येथे एकादाही 60 मिलीमीटरपेक्षा एकही पाऊस झाला नाही़ 337 मिमी पाऊस झाला़तळोदा तालुक्यात 485 मिलीमीटर पाऊस झाला़ परंतू येथे केवळ 39 दिवस पाऊस होता़ प्रथम या तालुक्यात कमी दिवस पाऊस पडला़धडगाव तालुक्यात 43 दिवसात 694 मिलीमीटर पाऊस झाला़ यात केवळ दोन वेळा 60 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस कोसळला़ अक्कलकुवा तालुक्यात 60 दिवसात 896 मिलीमीटर पाऊस झाला होता़ परंतू खंड कायम असल्याने दुष्काळी स्थिती आह़े
पावसातील खंडांमुळे मृदा आणि जलसंधारण होऊ शकलेले नाही़ ही गंभीर बाब आह़े शेतात पाणी मुरण्याचे प्रमाण कमी झाल्याने जमीनीची तहान भागत नाही़ पुनर्भरणाच्या योजना आता अधिक गतीने राबवणे गरजेचे आह़े शेतक:यांना पिक उत्पादन वाढ करण्यापेक्षा दोन वर्षे जलसंधारणाचे धडे द्यावे लागतील़ गेल्या पाच वर्षात भूजल पातळी खाली गेल्याने शेतक:यांचे सर्वाधिक नुकसान झाले आह़े - राजेंद्र दहातोंडे, समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र नंदुरबाऱ