नंदुरबार : तालुक्यातील शिंदगव्हाण शिवारातून जगदीश तोताराम पाटील यांच्या मालकीची ३० हजार रुपये किमतीची जीजे-०५ एलई-०५३७ ही दुचाकी अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. ही घटना १२ जानेवारी रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जगदीश पाटील यांच्या फिर्यादीवरून ३० ते ३५ वर्षे वयाच्या चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खापर येथे एकाविरोधात कारवाई
नंदुरबार : खापर, ता. अक्कलकुंवा येथे विनामास्क फिरणाऱ्या विनोद सुरेश तावडे, रा. झेंडा चाैक, खापर याच्यावर पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी पोलीस काॅन्स्टेबल नीलेश वसावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विनोद तावडे याच्याविरोधात अक्कलकुंवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळोदा शहरात एकावर गुन्हा दाखल
नंदुरबार : तळोदा शहरातील बसस्थानक रोडसमोर सुरसिंग सजन नाईक हा विनामास्क फिरत असल्याचे पथकाला दिसून आले होते. त्याच्याविरोधात पोलीस काॅन्स्टेबल राजू जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळोदा प्रकल्पाकडून विशेष योजना सुरू
नंदुरबार : आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी स्वयंसाहाय्यता बचत गटांना पोल्ट्रीफार्म व्यवसाय व शेळी गटपुरवठा करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. तळोदा, अक्कलकुंवा व धडगाव तालुक्यांतील बचत गटांसाठी ही योजना आहे. इच्छुकांनी ३१ जानेवारीपर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे अर्ज देण्याचे प्रकल्पाधिकारी अविशांत पांडा यांनी कळवले आहे.