लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 26 : दोंडाईचा येथील बालिकेवरील अत्याचार प्रकरणी सोमवारी नंदुरबारात निषेध मोर्चा काढण्यात आला. हातात निषेधाचे फलक, हाताला काळी पट्टी बांधून तरुण, तरुणी, महिला व नागरिक हजारोंच्या संख्येने त्यात सहभागी झाले. शहरातील विविध भागातून फिरून मोर्चा साक्री नाक्यावर गेल्यावर तेथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, मोर्चातील शिस्त व संयम पहाण्यासारखा होता.दोंडाईचा येथील बालिकेवर शाळेत अत्याचार करणा:या आणि संशयीताला संरक्षण देणा:या आरोपींवर कारवाई करावी या मागणीसाठी विविध समाज आणि संस्था, संघटनांतर्फे सोमवारी, दुपारी चार वाजता निषेध मूकमोर्चा काढण्यात आला. तैलिक मंगल कार्यालयापासून निघून मोर्चा गणपती मंदीर, नगरपालिका, हुतात्मा चौक, सोनारखुंट, टिळकरोड, जळकाबाजारमार्गे साक्रीनाक्यावर गेला. तेथे मोर्चाचे सभेत रुपांतर झाल्यानंतर तहसीलदारांना तेथेच निवेदन देण्यात आले. मोर्चात अग्रभागी तरुणी त्यानंतर, विद्यार्थीनी, महिला व नागरिक सहभागी झाले होते. प्रत्येकाच्या हातात निषेधाचे फलक होते. डोक्यावर निषेध लिहिलेल्या गांधी टोप्या होत्या.शिस्त आणि संयमनिषेध मूकमोर्चा असल्यामुळे त्यात शिस्त आणि संयम दिसून आला. चार, चार जणांच्या रांगांनी अतिशय शिस्तीत मोर्चा मार्गक्रमण करीत होता. रस्त्याने येणा:या-जाणा:या वाहनधारकांना विनंती करून मोर्चात व्यत्यय येणार नाही यादृष्टीने प्रयत्न केला जात होता. ठिकठिकाणी स्वयंसेवक देखील नेमण्यात आले होते. त्यांच्यातर्फे मोर्चातील रांगेचे नियोजन करणे, पोलिसांना सहकार्य करणे, कुणाला काही अडचण असल्यास मदत करणे यासह पाणी पाऊच पिऊन रस्त्यावर फेकल्यानंतर ते गोळा करणे आदी कामे होती.उन्हाची तीव्रता असतांनाही मोर्चेकरी मोठय़ा संख्येने त्यात सहभागी झाले होते.साक्रीनाक्यावर सभामूकमोर्चा साक्री नाक्याजवळ आल्यावर तेथे मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी अॅड.उमा चौधरी, माजी नगरसेविका अनिता चौधरी, शितल चौधरी, मिनाक्षी भदाणे, डॉ.तेजल चौधरी, सीमा मोडक, सुप्रिया कोतवाल, अर्चना चव्हाण, पुष्पा थोरात, रेखा वाघ, यशोदा शर्मा आदी महिलांसह अमदार शिरिष चौधरी, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे, मोहन माळी आदींनी मनोगत व्यक्त केले. अशा घटना यापुढे घडू नये यासाठी घटनेतील आरोपींना कडक शिक्षा करावी, त्यांना पाठीशी घालणा:यांनाही कडक शासन करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.तहसीलदारांना निवेदनमोर्चा तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयावर न नेता तो साक्री नाक्यावर येवून तेथे सभेत रुपांतर झाल्यावर विसजिर्त करण्यात आला. यावेळी निवेदन स्विकारण्यासाठी तहसीलदार नितीन पाटील हे स्वत: उपस्थित होते. शिष्टमंडळाच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले.पोलीस बंदोबस्तनिषेध मूकमोर्चा ज्या भागातून जाणार होता त्या भागात मोठय़ा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. काही भागातील वाहतूकही वळविण्यात आली होती. वाहनचालक व नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य केले.
बालिका अत्याचारप्रकरणी नंदुरबारात निषेध मूक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 6:25 PM