शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: तावडे आलेल्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
2
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
5
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
6
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
7
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
8
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
9
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
10
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
11
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
12
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
13
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
14
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
15
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
18
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
19
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
20
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल

आईनेही आधुनिकतेची कास धरावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 11:27 AM

जागतिक महिला दिन : ‘लोकमत’ कार्यालयात भेट देत महिलांनी मांडले आपआपल्या क्षेत्रातील अनुभव

नंदुरबार : जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी गुरुवारी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली़ या भेटीदरम्यान महिला सक्षमीकरण, सुरक्षितता, आरोग्य यासह विविध विषयांवर मुक्त चर्चा करुन प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभवही त्यांनी घेतला़ यावेळी वैद्यकीय क्षेत्रातून डॉ़ वृषाली पाटील, शिक्षण क्षेत्रातील शुभांगी दाऊतखाने, श्वेता चौधरी, कायदेतज्ञ अ‍ॅड उमा चौधरी, ब्युटीशियन व निसर्गोपचार तज्ञ भावना साबुवाला, शहर वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचारी जयश्री सोनवणे व भारती मोहने, जायंटस सहेलीच्या अध्यक्षा निना सोनी, सामाजिक कार्यकर्त्या मनिषा निकम यांनी चर्चासत्रात सहभाग घेतला़ आजच्या बदलत्या समाजजीवनात आईनेही टेक्नोसॅव्ही होऊन त्या पद्धतीचे शिक्षण पाल्यांना देण्याची गरज असल्याचा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला़ प्रसंगी त्यांनी त्यांचे वैयक्तिक अनुभव व त्यांच्यासोबत काम करणाऱ्या महिलांवर गुदरलेले प्रसंग सांगून त्याद्वारे विविध प्रश्न मांडले़ महिलांची सुरक्षा ही सामाजिक जबाबदारी असल्याचे त्यांचे म्हणणे होते़ आगामी काळात धावपळीचा तितकाच विज्ञान तंत्रज्ञानाला जवळ करणारा आहे़ त्यामुळे त्या पद्धतीने प्रत्येक महिलेने बदल स्विकारण्याची गरज असल्याचे महिलांनी सांगितले़१९ व्या शतकात अमेरिकेत स्वत:च्या अस्तित्त्वासाठी मोर्चा काढून महिलांनी व्यवस्थेला विरोध करत एल्गार पुकारला होता़ आठ मार्च हा तो दिवस़ त्यानंतर जगातील इतर देशात आठ मार्च रोजीच महिलांनी आंदोलने केली़ कालांतराने आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून घोषित करण्यात आला़ आपल्याकडे दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत असला तरी आजही भारतीय समाजात मुलगा आणि मुलगी असा भेद असल्याचे समोर येते़ शिक्षण क्षेत्रात काम करत असल्याने पालक मुलांना प्रथम प्राधान्य देत असल्याचे ध्यानी येते़ वास्ताविकता पुरुष प्रधान भारतीय संस्कृतीत वेदपुराण काळात स्त्रीही पुरुषांच्या बरोबरीने असल्याचे सिद्ध होते़ आज घडीस महिला ह्या शिक्षणामुळे सक्षम झाल्या आहेत़ परंतू यात त्यांचा नम्रपणा हरवला आहे़ अहंकार बळवल्याने बºयाच वेळा स्त्रियाच स्त्रियांचे पाय खाली खेचत असल्याचे अनुभव येत आहेत़ दुसरीकडे समाजात वावरणाºया महिला आणि मुली यांच्यात असुरक्षेची भावना आहे़ आवडीचे कपडे घालणे हा स्त्रीचा अधिकार आहे़ परंतू चांगल्या कपड्यांवरुनही स्त्रीबद्दल गैरसमज पसरवण्याचे कुजकट विचार कायम आहेत़ हा दृष्टीकोन चुकीचा आहे़ समाजातील दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुल घडवताना मातापालक त्यांना एकलकोंडे करण्याचा प्रयत्न करतात़ यातून सक्षम पिढी कशी घडेल़ मुलांना शेअरींग हा विषय महत्त्वाचा आहे़ यातून त्यांचे इतर मुलांसोबत छानपैकी बंध जुळून मैत्रींचं नातं निर्माण होतं़-श्वेता चौधरी, शिक्षणतज्ञ, नंदुरबाऱमहिला शिक्षिका ह्या नात्याने काम करताना वाईट अनुभव फारसे आलेले नाहीत़ आई आणि शिक्षिका अशी दोन्ही भूमिका वेगळ्या आहेत़ याकडे महिलांनी लक्ष दिले पाहिजे़ मुलं बदलत्या काळानुसार अपडेट होत आहेत़ त्यांच्यासोबत आई म्हणून मैत्री करताना आपणही अपडेट राहण्याची गरज आहे़ सोबत मुलीची आई असाल तर तिच्या जवळ राहून तिच्यासोबत संवाद वाढवणे आजच्या काळातील महत्त्वाची गरज आहे़ खरंतर नवीन आणि सक्षम पिढी तयार करण्यासाठी मुली आणि महिलांना प्रेरणा देण्याची गरज आहे़ त्यांच्यात आदर्श निर्माण होऊ शकतो अशा विचारांची रुजवात करण्याची गरज आहे़ शिक्षित होणं म्हणजे नम्र होणं असंच असतं हे महिलांनी समजून घेतले पाहिजे़ परंतू त्यांच्याकडून तशा प्रकारे वर्तणूक होत नसल्याचे दिसून येते़ महिलांनी महिलांसाठी काम करुन त्यांना बळ दिल्यास महिला सक्षमीकरणाचा हेतू पूर्ण होणार आहे़ महिलांच्या अनेक समस्या आजही कायम आहेत़ या समस्यांवर चर्चा करण्यापेक्षा प्रत्यक्षात काम करण्याचीही गरज देशात आहे़ याकडे दुर्लक्षून चालणार नाही़ बदलत्या काळात महिलांच्या समस्यांवर काम करण्याची गरज वाढत आहे़ प्रत्येकाने आपणहून सहभाग दिल्यावर यश मिळेल़-शुभांगी दाऊतखाने, शिक्षिका, नंदुरबाऱमहिला सक्षमीकरणात त्यांच्या आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे़ यासाठी प्रत्येक महिलेने आहाराकडे लक्ष दिले पाहिजे़ सकस आहार घेण्यासाठी स्वत:चा आहार स्वत: ठरवला पाहिजे़ आहारामुळे महिलांच्या मानसिक आरोग्याला बळ मिळते़ महिला असल्याने आजवर अडचणी कमी आल्या़ २० वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे़ परंतू हे क्षेत्र महिलांसाठी सुरक्षित आहे असे निश्चित म्हणता येईल़ लोकांकडून २० वर्षात डॉक्टरांवर असलेला विश्वास काहीसा कमी झाला असला तरी तो काळानुरुप घडलेला बदल आहे़ महिलांबद्दल समाजात बरेच गैरसमज आहे़ मी स्वत: रस्त्यावर अपशब्द वापरणाºया एकाच्या कानशिलात लगावली होती़ परंतू त्यावेळी एकाही व्यक्तीने पुढे येऊन त्याला जाब विचारला नाही़ बघ्याची भूमिका घेतली़ ही बाब चुकीची आहे़ समाजाने संरक्षण दिल्यास महिलांच्या समस्या दूर होतील़ समाजात यासोबत तंत्रज्ञानाचा मुद्दा महत्त्वाचा आहे़ महिलांना ते कळाले पाहिजे़ सोबतच स्त्रियांच्या हक्कांबद्दल जागृती आली पाहिजे़ महिलांनी कायमच मदतीची अपेक्षा करु नये़ स्वबळावर त्यांनी वाटचाल केली पाहिजे़ व्यायामाला महत्त्व दिल्यास त्यांच्यातील उत्साह बºयापैकी वाढणार आहे़-डॉ़ वृषाली पाटील, स्त्रीरोगतज्ञ नंदुरबाऱआपण ज्या देशात राहता त्या देशात दुसºयाला काहीना काही देत राहण्याची संस्कृती आहे़ महिला ह्या त्यागमूर्ती असल्याने त्यांनी सातत्याने पिढ्या घडवल्या आहेत़ प्रारंभी नगरपालिकेत नगरसेविका म्हणून काम करत असताना अनेक चांगले-वाईट अनुभव आले होते़ महिलांनी शिक्षणाचा योग्य पद्धतीने वापर केल्यास त्या स्वत:ला सिद्ध करु शकतात़ यातून त्यांच्या ज्ञानाचा उपयोग हा समाजाला होऊ शकतो़ विधी विषयाची परीक्षा देण्यासाठी बसमधून जात असताना एकाने छेड काढल्यावर बसच पोलीस ठाण्यात घेऊन गेली होती़ महिलांसाठी असंख्य कायदे आहेत़ घटनेने जन्मत: महिलांना अधिकार दिले आहेत़ महिलांनी संविधानाचे वाचन केल्यास त्यांना त्यांचे अधिकार कळतील सोबत समोरच्याने मांडलेला मुद्दा खोडून काढण्याचा आत्मविश्वास येईल़ वकीली क्षेत्र हे महिलांसाठी आजतरी सुरक्षित असे आहे़ घरातून पुढे शिक्षण घेण्यास विरोध होता़ परंतू त्यांची समजूत काढून संसार आणि शिक्षणात यश मिळवले़ हे फक्त एखादी स्त्रीच करु शकते़ महिलांनी चांगलं निष्पन्न करण्याचा प्रयत्न केला तर निश्चित चांगलंच होतं़ महिलांनी आरोग्यकडेही लक्ष देणं गरजेचे आहे़ बदलत्या काळात महिलांना पुरुषांच्या पाठिंब्यांची गरज आहे़ पोक्सोच्या २०० खटल्यांवर नुकतीच चर्चा झाली महिला सक्षमीकरणात त्यांच्यावरील अत्याचार कळीचा मुद्दा आहे़ महिलांवरील अत्याचारांचे अनेक प्रसंग घडतात़ केवळ सबळ पुराव्याअभावी कार्यवाही होत नाही़ महिलांनी जागरुक राहिले पाहिजे़-अ‍ॅड़ उमा चौधरी ज्येष्ठ विधीज्ञ, नंदुरबाऱ