लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : नवापुर तालुक्यातील विसरवाडी येथील सर्पमित्राने नागपंचमीच्या दिवशीच विसरवाडी व परिसरातून दोन ठिकाणी धामण जातीचे सर्प पकडून त्यांना जीवदान देत जंगलात सोडून खऱ्या अर्थाने नागपंचमी साजरी केली.विसरवाडी गावात नंदुरबार रस्त्यालगत एसटी महामंडळात वाहक असलेले वसंत गावीत यांच्या घरी फुल झाडांमध्ये साप असल्याचे त्यांच्या कुटूंबियांना दिसून आले होते़ त्यांनी तातडीने गावातील सर्पमित्र मनोज गावीत यास माहती देऊन बोलावून घेतले़ मनोज याने तातडीने वसंत गावीत यांच्या घरी भेट देत झाडात लपलेला साप अलगद बाहेर काढला़ धामण प्रजातीचा हा साप होता़ या सापाला जंगलात सोडत असताना जुनी विसरवाडी येथील एकाच्या घरी पुन्हा साप निघाल्याची माहिती त्यास देण्यात आली़ तेथेही तातडीने वसंत गावीत याने हजेरी लावत तो साप पकडून जंगलात सोडून दिला़ तसेच जुनी विसरवाडी येथे देखील एका व्यक्तीच्या घरी धामण जातीचा सर्प पकडून त्याला देखील जंगलात सोडून दिले. सर्पमित्र मनोज याने नागपंचमीच्या दिवशी केलेल्या कार्याचे विसरवाडी गावातून कौतूक करण्यात येत आहे़
नागपंचमीला दोन सापांना दिले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 1:00 PM