ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 29 : दक्षिणेकडील राज्यात निपाह विषाणूमुळे होणा:या आजारांच्या उद्रेकामुळे जिल्ह्यातदेखील आवश्यक ती उपाययोजना करण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांना आवश्यक ती खबरदारी घेण्याबाबत संबंधितांना सूचित करण्याचे आदेश जिल्हाधिका:यांनी दिले आहेत. दरम्यान, तळोदा येथे एकाच ठिकाणी 30 पेक्षा अधिक वटवाघूळ मेल्याचे निदर्शनास आल्यामुळे भीती व्यक्त होत आहे. दक्षिणेकडील केरळ राज्यात कोझीकोडे व परिसरात निपाह विषाणूमुळे होणा:या आजाराचा उद्रेक झाला आहे. त्याचा प्रसार इतरत्रदेखील होत आहे. गोव्यातदेखील या विषाणूजन्य आजाराचा एक रुग्ण आढळल्याची बाब उघड झाली आहे. त्यामुळे राज्यातदेखील याबाबत विशेष दक्षता घेण्याच्या सूचना आरोग्य सेवा संचालनालय यांनी जिल्हा प्रशासनांना दिल्या आहेत. नंदुरबार जिल्ह्यातदेखील याबाबत विशेष दक्षता घेतली जात आहे.बर्ड फ्लूचा कटू अनुभवराज्यात 12 वर्षापूर्वी बर्ड फ्लूचा पहिला उद्रेक जिल्ह्यातील नवापूर भागात झाला होता. त्या वेळी ईशान्येकडील राज्यांमध्ये बर्ड फ्लू प्रथम आढळून आला होता. त्यानंतर थेट नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील पोल्ट्री फार्ममधील कोंबडय़ांवर बर्ड फ्लूचा विषाणू आढळून आला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे निपाह विषाणूबाबतदेखील विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.बांगलादेश मूळ केंद्रनिपाह विषाणूचे मूळ केंद्र हे बांगलादेश आहे. या देशात दरवर्षी या आजाराचा उद्रेक होत असल्याचे सांगण्यात आले. निपाह विषाणू सर्वप्रथम 1998 मध्ये मलेशियामध्ये आढळून आला होता. भारतात पश्चिम बंगालमधील सिलिगुडी भागात 2001 व नाडिया भागात 2007 साली या विषाणूंचा उद्रेक सर्वप्रथम झाल्याचेही सांगण्यात आले.विषाणूचा प्रसारया विषाणूचा प्रसार हा मुख्यत्वे फळांवर जगणा:या वटवाघळांमार्फत होतो. वटवाघळांनी अर्धवट खाल्लेली फळे हाताळल्याने अथवा खाल्ल्याने हा आजार होतो. याशिवाय वराहांमुळेदेखील याचा प्रसार होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.जिल्हास्तरावर उपाययोजनाजिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांना यासंदर्भात जनजागृती आणि उपाययोजना करण्याबाबत सूचित केले आहे. नागरिकांमध्ये भीती पसरू नये यासाठी जनजागृती करावी व प्रतिबंधात्मक खबरदारी काय घ्यावी याबाबत संबंधितांना सूचित करावे, असेही त्यांनी सांगितले. सिव्हिलला संदर्भ कक्षजिल्हा रुग्णालयात यासाठी संदर्भ कक्ष सुरू करण्यात आला आहे. या आजारावरील उपचारासाठी सध्या तरी औषध किंवा लस उपलब्ध नाही. दोन औषधी उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. परंतु तीही परिणामकारक नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सांगितले. या आजारात साधारणत: श्वास घेण्यास त्रास होणे, तीव्र ताप, डोकेदुखी, कफ आदी त्रास होऊ शकतो. परंतु हे त्रास सामान्य आजारासारखे आहेत. त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये व लागलीच उपचार घ्यावा, असेही आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
‘निपाह’ विषाणूच्या पाश्र्वभुमीवर नंदुरबारात सजगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:54 PM