लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पाणी पुरवठ्याबाबत नंदुरबारवासीयांना गेल्या १५ वर्षांपासून कुठलीही टंचाई निर्माण झाली नाही. शहरवासीयांना दर एकदिवसाआड ४५ मिनिटे पाणीपुरवठा केला जातो. विरचक प्रकल्पाच्या पंपींग स्टेशनजवळ असलेल्या दोन जलशुद्धीकरण प्रकल्पातून पाणी शुद्ध करून ते शहरवासीयांना पुरविले जाते. नंदुरबारातील जवळपास दीड लाख लोकसंख्येला विरचक व आंबेबारा प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जातो. विरचक प्रकल्पातून ज्या भागात पाणीपुरवठा होतो तो शुद्धीकरण प्रकल्पातून असतो तर आंबेबारा धरणातून अर्थात आष्टे पंपींग स्टेशनमधून येणारे पाणी हे जलकुंभातच आवश्यक तसे शुद्धीकरण केले जाते. शहरात झोन नुसार ज्या भागात पाणीपुरवठा केला जातो त्या भागातील पाणी नमुने दररोज घेऊन ते शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठिवले जातात. दर एक किंवा दोन दिवसाआड त्या नमुन्यांचा अहवाल पालिकेला प्राप्त होतो. यासाठी स्वतंत्र एका कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आलेली आहे. पालिकेने आता वाढीव पाणीपुरवठा योजना तयार केली आहे. त्याचा सर्व्हेदेखील करण्यात आला आहे. या योजनेला मान्यता मिळाल्यास शहरवासीयांना मिटरप्रमाणे दररोज पाणी पुरवठा होणार आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. दरम्यान, पालिकेने शहरवासीयांसह शासकीय कार्यालयांना देखील मिटरप्रमाणे पाणी पुरवठा केला आहे. शहरालगतच्या वसाहतींचीही तशी मागणी आहे.
दररोज ८० ते ९० लाख लिटर पाणी पुरवठाशहरात १५ जलकुंभांमधून दररोज झोननुसार ८० ते ९० लाख लिटर पाणी पुरवठा केला जातो. सर्व भागात पुरेशा दाबाने पाणीपुरवठा व्हावा यासाठी ठिकठिकाणी व्हॅाल्व तयार करण्यात आले आहेत. जवळपास १५ हजारापेक्षा अधीक नळजोडणीधारक आहेत. याशिवाय शासकीय कार्यालये, शासकीय रुग्णालये यांना देखील पाणीपुरवठा केला जातो. सर्व भागात शुद्ध पाणी पुरवठा केला जात असल्याचा पालिकेचा दावा आहे.
अशी हाेते तपासणी नंदुरबारात दर एक दिवसाआड त्या त्या भागात पाणी पुरवठा केला जातो. अर्थात दररोज निम्मे शहरात पाणी पुरवठा होतो. ज्या भागात पाणी पुरवठा होतो त्या झोनमधील पाणी नमुने घेतले जातात. ते जिल्हा रुग्णालयाच्या लॅबमध्ये चेकींगसाठी पाठविले जातात. झराळी येथे असलेल्या दोन्ही पाणी शुद्धीकरण प्रकल्पातील पाण्याची गुणवत्ता तेथे असलेल्या लॅबमध्ये दररोज तपासली जाते. त्यानंतरच पाणी पुरवठा केला जातो.
१,४५,००० शहराची लोकसंख्या १४०(लिटर) प्रती माणसी दररोज दिले जाते पाणी १५ टाक्या पाणी वितरण करण्यासाठी २ जलशुद्धीकरण केंद्र
शहरवासीयांना शुद्ध पाणी पुरवठा व्हावा यासाठी पालिका कटीबद्ध आहे. यासाठी दोन जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वीत आहेत. तेथे दररोज पाण्याची गुणवत्ता तपासणी केली जाते. शिवाय शासकीय लॅब मध्ये देखील पाणी नमुने तपासणीसाठी पाठविले जातात. दररोज नियमित पाणीपुरवठा होतो. -कैलास पाटील, पाणीपुरवठा सभापती, नंंदुरबार नगरपालिका.