नंदुरबार : जिल्ह्यातील दोन सहकारी आणि एका खासगी साखर कारखान्यामध्ये गेल्या १५ दिवसांत केवळ ६५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. मजुरांची संख्या कमी असल्याने कारखान्यांच्या गाळपावर परिणाम झाला आहे़शहादा येथील सातपुडा सहकारी साखर कारखान्याने यंदा चार लाख ५० हजार मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे़ त्यांच्याकडून शेतकºयांच्या उसाला दोन हजार ४०० रुपये प्रतीटन दर देण्यात आला असून मंगळवारपर्यंत ३० हजार मेट्रिक टन उसाच्या गाळपातून १८ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे़नवापूर तालुक्यातील डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्याच्या गाळपाचा मंगळवारी १४ वा दिवस होता़ आतापर्यंत ११ हजार ८०२ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून यंदा चार लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. खासगी साखर कारखान्याने यंदा चार लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट असून आतापर्यंत २४ हजार २९० मेट्रिक टन गाळप झाले़>जिल्ह्यात यंदा साखर कारखान्यांना मजूरटंचाईचा सामना करावा लागत असला, तरी कारखान्यांवर निष्ठा असलेले मजूर येत आहेत़ येत्या काही दिवसांत पूर्ण क्षमतेने मजूर आल्यानंतर ऊसतोडीला वेग येईल.- प्रवीण पाटील, जनसंपर्क अधिकारी, सातपुडा सहकारी साखर कारखाना, पुरुषोत्तमनगर, ता़ शहादा़
नंदुरबारमध्ये तीन कारखान्यांत ६५ हजार मेट्रिक टन गाळप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 5:26 AM