- मनोज शेलार नंदुरबार- शासनाचे १० कोटी ८२ लाख ६४ हजार २२० रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या विरोधात अखेर नंदुरबारात गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार यांनी ही फिर्याद दिली आहे.
मंजुळे हे फेब्रुवारी ते जुलै २०१९ मध्ये नंदुरबार जिल्हाधिकारी असताना त्यांनी अनधिकृत बिनशेती वापर, शरतीभंग प्रकरणे, भोगवटा वर्ग १ व २ रुपांतरीत करणे आदी १८ प्रकरणात त्यांनी शासनाचे १० कोटी ८२ लाख ६४ हजार २२० रुपयांचे नुकसान केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याबाबत विभागीय आयुक्त यांनी चौकशी केली होती. त्यानंतर हा गुन्हा दाखल झालाआहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल तहसीलदार अनिल गवांदे यांनी ही फिर्याद दिली आहे. यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.