लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार व नवापूर सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणा:या अपघात स्थळांच्या सुधारणा कार्यक्रमाच्या कामांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती आह़े गुरुवारी मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका:यांची बैठक पार पडत आह़े या वेळी कामांच्या मंजुरीचे पत्रही (वर्कऑर्डर) मिळण्याची शक्यता आह़ेजिल्ह्यातील अपघातांच्या घटनांमध्ये होत असलेल्या वाढीबाबत ‘लोकमत’तर्फे सविस्तर वृत्त देण्यात आले होत़े त्यानंतर प्रशासन चांगलेच कामाला लागले असल्याची चर्चा जनसामान्यांमध्ये रंगत आह़े अपघात स्थळ सुधारणा कार्यक्रम 2017-2018 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नंदुरबारअंतर्गत 1 तर नवापूर विभागांतर्गत 2 कामे प्रस्तावित आहेत़ या कामांसाठी एक कोटी 10 लाख रुपयांची आवश्यकता असल्याचे विभागाकडून सांगण्यात आल़े या कामांपैकी, नंदुरबार उपविभागअंतर्गत राज्य महामार्ग क्रमांक 6 वरील पाळधी, अमळनेर, दोंडाईचा, नंदुरबार धानोरा रस्त्यावरील साधारणत 1 किलो मीटरच्या रस्त्यावरील अपघात स्थळाच्या सुधारणेसाठी 50 लाख रुपयांची कामे प्रस्तावित आहेत़ तसेच नवापूर विभागाअंतर्गत येणा:या राज्य महामार्ग पाचवरील नांदुर्खे, कडुपाडा खोकसे, बोरपाडा, हळदाणी,विसरवाडी, नंदुरबार, प्रकाशा, शहादा, खेतीया या मार्गावरील अपघात स्थळ क्षेत्राच्या सुधारणेसाठी 30 लाख रुपयांची कामे प्रस्तावित आहेत़ तर, राज्य महामार्ग 14 वरील नवापूर, पिंपळनेर, साक्री या मार्गावरील अपघातस्थळांसाठीही 30 लाख रुपयांची कामे करणे गरजेचे आहेत़धुळे येथील सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालयात डेपोटी सेक्रेटरी इंगोले यांनी विभागाच्या अधिका:यांची बैठक घेतली होती़ त्यात त्यांनी अपघातग्रस्थ स्थळांची व प्रस्तावित कामांची माहिती घेण्यात आली़ गेल्या महिनाभरापूर्वी नंदुरबार व नवापूर उपविभागाकडून अपघातग्रस्त स्थळांसाठी लागणा:या निधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आह़े नवापूर तालुक्यातील चरनमाळ घाटात मोठय़ा संख्येने अपघात होत असतात़ त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या घाटालाही ब्लॅक स्पॉट घोषित करण्यात आले आह़े त्यासह खोकसे, दापुर, हळदाणी, विसरवाडी याही भागात ब्लॅक स्पॉट सुधारणा समितीने सुचविल्यानुसार वळण सुधारणा करण्याचे काम प्रास्तावित करण्यात आले आह़े जिल्ह्यात ब:याच अपघातग्रस्त स्थळांना ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत़ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शहादा व तळोदा उपविभागाअंतर्गत येत असलेल्या अपघातग्रस्त स्थळांची बरीच कामे पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती शहादा विभागाचे कार्यकारी अभियंता ङोलसिंग पावरा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़ नंदुरबार व नवापूर उपविभागांतर्गत तीन मोठे अपघातस्थळ येतात़ सध्या या प्रस्तावित कामांना मंजुरी देण्यात आली असली तरी कामांची निवीदा प्रक्रिया लवकरात लवकर राबवून अपघातप्रणव स्थळांची लवरात लवकर सुधारणा करण्यात यावी अशी अपेक्षा आता व्यक्त करण्यात येत आह़े़
नंदुरबार अपघात स्थळ सुधारणा कार्यक्रम : 1 कोटींच्या कामांना मिळणार मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:12 PM