शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

नंदुरबारसह नवापूर व तळोद्याचे नगराध्यक्ष 23 रोजी होतील विराजमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 11:43 AM

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबारसह नवापूर व तळोदा पालिकांचे नवनिर्वाचीत नगराध्यक्ष हे 23 डिसेंबर रोजी पदभार स्विकारण्याची शक्यता आहे. विद्यमान सदस्यांची मुदत 23 डिसेंबर रोजी संपणार आहे. दरम्यान, निवडून आलेल्या नवीन सदस्यांची नावे येत्या दोन दिवसात राजपत्रात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. विद्यमान नगराध्यक्ष, पदाधिकारी व सदस्यांची मुदत 23 डिसेंबर्पयत आहे. त्याआधीच ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबारसह नवापूर व तळोदा पालिकांचे नवनिर्वाचीत नगराध्यक्ष हे 23 डिसेंबर रोजी पदभार स्विकारण्याची शक्यता आहे. विद्यमान सदस्यांची मुदत 23 डिसेंबर रोजी संपणार आहे. दरम्यान, निवडून आलेल्या नवीन सदस्यांची नावे येत्या दोन दिवसात राजपत्रात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. विद्यमान नगराध्यक्ष, पदाधिकारी व सदस्यांची मुदत 23 डिसेंबर्पयत आहे. त्याआधीच निवडणुका होऊन नवीन सदस्य निवडून येवून त्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक असते. त्यानुसार 18 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले. त्याच दिवशी दुपारी निवडून आलेले नगराध्यक्ष व नगरसेवकांची नावे राजपत्रात प्रसिद्धीसाठी पाठविण्यात आली आहेत. त्यानुसार 21 किंवा 22 रोजी राजपत्रात नावे प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यानंतर लागलीच नवीन सदस्य पदभार स्विकारणार आहेत.सदस्यसंख्या वाढलीविद्यमान पालिका सदस्यांपेक्षा नव्याने निवडून आलेल्या सदस्यांची संख्या वाढली आहे. नंदुरबारात 37 सदस्यसंख्या होती ती आता 39 झाली आहे. नवापुरात 18 सदस्यसंख्या होती ती 20 झाली आहे तर तळोद्यात 17 सदस्यसंख्या होती तेथे 18 झाली आहे. याशिवाय थेट जनतेतून नगराध्यक्ष देखील निवडण्यात आले आहेत. 23 रोजी पदभारयापूर्वी प्रभागातून निवडून आलेल्या सदस्यांमधून नगराध्यक्षांची निवड केली जात होती. त्यामुळे मुदतीच्या आत विशेष सभा घेवून नगराध्यक्षांची निवड करणे आवश्यक राहत होते. आता मात्र थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड झाल्याने आता केवळ नवीन नगराध्यक्ष हे पदभार स्विकारणार आहेत. साधारणत: 23 डिसेंबर रोजी नवीन नगराध्यक्ष पदभार स्विकारतील असा अंदाज वर्तविला जात आहे. 24 रोजी रविवार असल्याने आणि 25 रोजी नाताळची सुटी असल्यामुळे 23 रोजीच पदभार घ्यावा लागणार आहे. त्यासाठी निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध होण्याची प्रतिक्षा लागून आहे.उपनगराध्यक्ष व विविध समितीनगराध्यक्षांनी पदभार स्विकारल्यानंतर लागलीच उपनगराध्यक्ष व विविध समितींचे सदस्यांची निवड प्रक्रिया होणार आहे.  साधारणत: 30 डिसेंबर रोजी उपनगराध्यक्ष आणि विविध विषय समितींच्या सभापती व सदस्यांची निवड होण्याची शक्यता आहे. नुतन नगराध्यक्ष हे याबाबतच्या प्रक्रियेची घोषणा करतील. नगराध्यक्ष पदभार स्विकारण्यासाठी पीठासीन अधिका:यांची गरज राहणार नाही. उपनगराध्यक्ष व विषय समिती निवडीसाठी मात्र पीठासीन अधिका:यांची नेमणूक करावी लागणार असल्याचे सूत्रांनी   सांगितले.उपगराध्यक्षपदी कुणाची वर्णीउपनगराध्यक्षपदी कुणाची वर्णी लागते याकडे तिन्ही ठिकाणच्या सदस्यांचे लक्ष लागून आहे. नंदुरबारात प्रत्येकी एका वर्षासाठी उपनगराध्यक्षपद दिले जाते. त्यातही विविध समाजाला प्रतिनिधीत्व देण्याचा प्रय} असतो. त्यानुसार पहिल्या वर्षी कुठल्या समाजाला प्रतिनिधीत्व मिळते याकडे लक्ष लागून आहे. सभापतीपदाकडेही लक्षपालिकांमध्ये विविध विषय समिती सभापतींची देखील निवड होणार असल्याने सभापतीपदी कुणाची निवड होते याकडेही लक्ष लागून आहे. स्थायी समिती, पाणीपुरवठा, आरोग्य व स्वच्छता, बांधकाम, अर्थ व नियोजन, महिला व बालकल्याण आणि शिक्षण समिती असून त्यावर सभापती आणि आठ ते दहा सदस्य यांची नियुक्ती केली    जाते.नवीन नगराध्यक्ष आणि सदस्यांच्या स्वागताच्या दृष्टीने त्या त्या नगरपालिकांमध्ये तयारी सुरू करण्यात आली आहे. प्रशासकीय स्तरावर देखील तयारी सुरू आहे.