लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 13 : तापमानासोबतच वाढत्या आद्रतेने जीवाची लाही लाही होत असल्याने नंदुरबारकर चांगलेच हैराण झाले आहेत़ शनिवारी 43 अंश सेल्सिअस तापमान तर तब्बल 29 टक्के आद्रतेची नोंद करण्यात आली आह़े त्यामुळे साहजिकच वाढत्या उकाडय़ाने जीव नकोसा झाला असल्याची भावना नागरिकांकडून उमटताना दिसून येतेय़ यंदाच्या मोसमातील सर्वाच्च तापमान बुधवारी नोंदविण्यात आले होत़े ते 44़9 अंश सेल्सिअस इतके होत़े त्याच दिवशी साधारणत 28 टक्के इतकी आद्रतेची नोंद करण्यात आली होती़ साधारणत समुद्र किना:यावरील शहरी भागात 50 ते 60 टक्के इतकी आद्रता असत़े परंतु नंदुरबारसारख्या शहरातसुध्दा जवळपास 30 टक्के आद्रतेची नोंद होत असल्याने उकाडय़ात कमालीची वाढ होत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आह़े सध्या नंदुरबार शहराचे तापमान 41 ते 43 अंशावर स्थिर आहेत़ परंतु वातावरणातील आद्रतेत मात्र कमालीची वाढ होत आह़े सुरुवातीला 19 ते 20 टक्यांवर असलेली आद्रता आजअखेरीस 29 टक्यांवर पोहचली आह़े त्यामुळे साहजिकच सर्वसामान्यांना हा उकाडा असह्य झाला आह़े जवळपास ताशी 25 किमी प्रतिवेगाने ‘हिट वेव्हस्’ म्हणजे उष्ण लहरी वाहत आहेत़ दुपारी तसेच मध्यरात्रीसुध्दा या उष्णतेच्या झळा जाणवू लागल्या आहेत़ वाढत्या तापमान व उष्णतेमुळे नागरिक घराबाहेर जायबंदी झाले असल्याची स्थिती आह़े दरम्यान, राजस्थानाकडून येत असलेल्या अतिउष्ण लहरींच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने याचा परिणाम जिल्ह्यातील तापमानावर व उष्णतेवर जाणवत आहेत़ येत्या काही दिवसात खान्देशात उष्णतेची लाट अधिक पसरणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आह़े नंदुरबारात गेल्या काही दिवसांपासून दमट हवामान निर्माण झाल्याने नागरिकांना दुपारच्या वेळी अक्षरश घामाच्या धारा लागत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आह़े सर्व वयोगटातील नागरिक उकाडय़ाने त्रस्त झाले आहेत़ दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानामुळे याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर जाणवू लागला आह़े वाढत्या तापमानाचा अनेकांना त्रास जाणवत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आह़े उष्णतेमुळे पाण्याचे प्रमाणत कमी होत असल्याने अनेकांना ‘डिहायड्रेशन’चा त्रास होत आह़े त्याच प्रमाणे अंगात बारीक ताप असणे, अशक्तपणा येणे, तोंड वारंवार कोरडे होणे, कुठलेही काम करण्याची इच्छा न होणे, नैराश्य जाणवने, हात पाय दुखणे आदी विविध प्रकारे लक्षण वाढत्या तापमानामुळे नागरिकांमध्ये दिसून येत आहेत़ उन्हाळ्यात तापमान तसेच आद्रता जास्त असल्याने उकाडा जाणवत असतो़ त्यामुळे साहजिकच या दिवसांमध्ये घामाव्दारे मोठय़ा प्रमाणात पाण्याचे विसजर्न होत असत़े अशा स्थितीत शरिरात पाण्याची कमतरता जाणवत असल्याने दिवसभरातून निदान तीन ते चार लीटर पाणी पिण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांकडून देण्यात येत आह़े उन्हाळ्यात मोठय़ा प्रमाणात घाम येत असतो़ याकडे दुर्लक्ष केल्यास तो त्वचेत मुरत असून त्यामुळे अनेक त्वचा विकारसुध्दा होण्याचा धोका नाकारता येत नाही़ त्यामुळे आलेला घाम त्वरीत कापडाने पुसणे महत्वाचे असत़े त्याच प्रमाणे उन्हाळ्यात हलक्या, फिकट रंगाच्या कपडय़ाचा वापर करावा, जास्तीत जास्त कॉटन किंवा खादीचे कपडे घालावे, त्याच प्रमाणे उन्हाळ्यात जास्त फिट कपडे न घालता सैल कपडे घालावे जेणेकरुन घाम येण्याचे प्रमाण यामुळे कमी होत असत़े उन्हाळ्यात मसाले पदार्थ, तेलकट तसेच मद्याचे सेवन करणे घातक ठरु शकत़े या पदार्थाच्या सेवनामुळे पित्ताशयाचे आजार वाढण्याची शक्यता वाढत असत़े त्याच प्रमाणे अल्सर सारखे आजारसुध्दा यामुळे बळावत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आह़े वाढत्या उष्णतेमुळे या पदार्थाचे सेवन टाळून त्याऐवजी सात्विक जेवनावर भर द्यावे तसेच आहार दुध, दही, ताक आदींचा समावेश करणे महत्वाचे ठरत असत़े
असह्य उकाडय़ाने नंदुरबारकर बेहाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 12:54 PM