शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

नंदुरबारातील व्यापा:यांचा ‘बंद’ लांबल्यास ‘संकट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 10:37 AM

नंदुरबार : शासनाने आधारभूत किमतीनुसार माल खरेदी न करणा:या व्यापा:यांवर गुन्हे दाखल करण्याच्या निषेधार्थ जिल्ह्यात बाजार समित्या मंगळवारपासून बंद आहेत़ तूर्तास या बंदचा परिणाम जाणवत नसला तरी तीन आठवडय़ांपेक्षा जास्त वेळ बंद सुरू राहिल्यास शेतक:यांना मोठय़ा संकटांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आह़े  व्यापा:यांचा हा बंद हंगामात नसला तरी तुरळक माल ...

नंदुरबार : शासनाने आधारभूत किमतीनुसार माल खरेदी न करणा:या व्यापा:यांवर गुन्हे दाखल करण्याच्या निषेधार्थ जिल्ह्यात बाजार समित्या मंगळवारपासून बंद आहेत़ तूर्तास या बंदचा परिणाम जाणवत नसला तरी तीन आठवडय़ांपेक्षा जास्त वेळ बंद सुरू राहिल्यास शेतक:यांना मोठय़ा संकटांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आह़े  व्यापा:यांचा हा बंद हंगामात नसला तरी तुरळक माल विक्री करणारे सातत्याने हजेरी लावतात़ यातून गेल्या चार दिवसांपासून उलाढाल पूर्णपणे बंद असून येत्या काळात राज्यस्तरावर व्यापा:यांच्या पुणे येथे होणा:या बैठकीनंतर बंदबाबत निर्णय होणार असल्याचे खात्रीलाक वृत्त आह़े बंदमुळे नंदुरबार बाजार समितीत खास परिणाम झाला नसला तरी धडगाव, अक्कलकुवा, तळोदा, शहादा आणि नवापूर येथे आठवडे बाजारानिमित्त किरकोळ धान्य विक्रीसाठी येणारे आदिवासी शेतकरी हैराण झाले आहेत़ बंद तीन महिने सुरू राहिल्यास नंदुरबार जिल्ह्यातील मिरची, मका आणि ज्वारी उत्पादक शेतक:यांना मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत़ जिल्ह्यात यंदा पावसाची स्थिती चांगली नसली तरी पिके तग धरून असल्याने किमान उत्पादनाची हमी शेतक:यांना आह़े यासोबतच सध्या बाजारात हिरव्या मिरचीचे उत्पादन येऊ लागले आह़े तूर्तास हिरव्या भाजीपाल्यात या मिरचीची विक्री होत असली तरी येत्या 15 दिवसात लाल मिरचीचे उत्पादन शेतकरी विक्रीसाठी आणणार आहेत़ गहू सोबतच ज्वारी उत्पादक शेतक:यांनाही या बंदचा फटका बसतो आह़े ज्वारी खरेदीचा हंगाम सुरू झाल्यावेळी 1000 ते 1300 या दरात खरेदी करण्यात येणारी ज्वारी गेल्या महिन्यापासून शेतकरी 1 हजार 600 रूपयांर्पयत खरेदी करत होत़े प्रामुख्याने अक्कलकुवा आणि धडगाव बाजार समितीत ज्वारीची दर दिवशी 30 क्विंटल आवक होत असल्याची माहिती देण्यात आली आह़े नंदुरबार बाजारात गेल्या वर्षात ऑक्टोबर महिन्यापासून मिरची खरेदीला सुरूवात झाली होती़ यात ओली मिरची 1200 ते 2800 तर सुकी मिरचीला 4000 ते 8900 रूपये प्रतिक्विंटल दर देण्यात आला होता़ येत्या काळात पुन्हा मिरची हंगाम सुरू झाल्यावर यापेक्षा अधिक चढय़ा दराने मिरची खरेदी होण्याची अपेक्षा शेतक:यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े बाजार समित्यांच्या बंदमुळे नंदुरबार आणि शहादा बाजार समितीत केवळ भाजीपाला मार्केट तूर्तास सुरू आह़े उर्वरित भुसार माल खरेदी विक्री बंद आह़े यामुळे मार्केट यार्डात शुकशुकाट आह़े यामुळे हमाल आणि वाहतूकदार यांचा रोजगार बुडत असून काहीजण भाजीपाला मार्केटकडे वळले आहेत़ शेतक:यांकडून बंदबाबत चिंता व्यक्त होत असल्याचे चित्र दिसून आले आह़े जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये एप्रिल महिन्यापासून प्रत्यक्षात गहू खरेदीला सुरूवात झाल्यापासून 2189 या वाणाला प्रतीक्विंटल 1840 ते 2002 रूपये तर लोकवन या वाणाला 1550 ते 1950 असा प्रतिक्विंटल दर देण्यात येत होता़ या दरात वाढ होण्यापेक्षा 100 रूपयांर्पयत वेळोवेळी घसरण होत होती़ दरांमध्ये घसरण सुरू झाल्यानंतर जून महिन्याच्या मध्यापासून आवक घटली होती़ यंदा जुलैच्या अंतिम आठवडय़ापासून गहू दरांमध्ये वाढ झाल्याची माहिती शेतक:यांना मिळाल्यानंतर पुन्हा आवक सुरू झाली होती़ यात 2189 गहू वाणाला 1 हजार 800 ते 2 हजार 200 तर लोकवन गव्हाला 1 हजार 800 ते 2 हजार 100 रूपये प्रतिक्विंटल दर देण्यात येत होता़ चांगला दर्जा आणि सुस्थितीत असलेल्या गव्हाला व्यापारी 100 रूपये जास्त भाव देत असल्याचे सांगण्यात आल़े तसेच यातून गेल्या एक महिन्यात अडीच हजार क्विंटलपेक्षा गहू आवक झाल्याचा अंदाज आह़े विशेष म्हणजे एकटय़ा नंदुरबार बाजार समितीत गेल्या वर्षाच्या एप्रिल महिन्यापासून जूनर्पयत 1 लाख क्विंटल गहू आवक झाली होती़