शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
4
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
5
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
6
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
7
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
8
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
9
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
10
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
11
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
12
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
13
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
14
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
15
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
16
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
17
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
18
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
19
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
20
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स

नंदुरबार लोकसभेची जागा जिंकण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 11:36 AM

शहाद्यात काँग्रेसचा मेळावा : धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील नेत्यांची उपस्थिती

शहादा : आगामी लोकसभा निवडणुकीत नंदुरबार लोकसभा निवडणूक जिंकण्याचा निर्धार सर्वच नेत्यांनी शहादा येथे मंगळवारी झालेल्या काँग्रेस मेळाव्यात व्यक्त केला. मेळाव्यास नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील नेते व कार्यकर्त्यांच्या एकजुटीचे दर्शनही घडले. केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांवर टीका करताना शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य जनतेची दिशाभूल करणाऱ्या या सरकारला हद्दपार करण्याचे आवाहनही मेळाव्यात करण्यात आले.नंदुरबार जिल्हा काँग्रेसचा मेळावा शहादा येथील खरेदी-विक्री संघाच्या आवारात मंगळवारी झाला. अध्यक्षस्थानी माजी खासदार माणिकराव गावित होते. या वेळी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष दीपक पाटील, माजी खासदार बापू चौरे, आमदार अ‍ॅड.के.सी. पाडवी, माजी मंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी, आमदार काशीराम पावरा, आमदार डी.एस. अहिरेल काँग्रेसचे राज्य सरचिटणीस प्रकाशराव सोनवणे, जिल्हा प्रभारी योगेश पाटील, जि.प. अध्यक्षा रजनी नाईक, उपाध्यक्ष सुहास नाईक, धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्याम सनेर, शिरीष नाईक, भरत गावीत, रामचंद्र पाटील, रमेश गावीत, दत्तू चोरे, आत्माराम बागले, रतन पाडवी, कुणाल वसावे, संजय माळी, सी.के. पाडवी, विक्रम पाडवी, रोहिदास पाडवी, प्रा.संजय जाधव, उपनगराध्यक्षा रेखा चौधरी, गौतम जैन, जि.प. सदस्या संगीता पाटील, राजाराम पाटील, जगदीश पाटील, सुनील सखाराम पाटील , प्रेमसिंग आहेर, रवींद्र रावल, नवापूरच्या नगराध्यक्षा हेमलता पाटील, सभापती रंजना नाईक, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शमीमबी कुरेशी, कंचनबाई पाटील, शांताबाई पवार, दीपक पटेल, विक्रम पाडवी आदी उपस्थित होते.यावेळी राज्य सरचिटणीस सोनवणे म्हणाले की, राज्य व देशात आज वेगळेच चित्र पहायला मिळत आहे. जनता हवालदिल झाली असून सर्वत्र दहशतीचे वातावरण आहे. यातून सावरायचे असेल तर कॉंग्रेसशिवाय पर्याय नाही, सत्तेवर येण्यापूर्वी भाजप सरकारने खोटे आश्वासन देऊन जनतेची दिशाभूल केली आहे. देशाला विकासाची दिशा देण्यासाठी आणि या नौटंकी सरकारला घालविण्यासाठी काँग्रेसला साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले.अ‍ॅड.पद्माकर वळवी म्हणाले की, नदुंरबार जिल्हा क्राँग्रेसमय आहे. शेतकरी-कष्टकºयांना उभे करण्याचे काम काँग्रेसने केले आहे. काँग्रेसचे कायदे देश व जनतेच्या हिताचे होते ते मोडकळीस आणण्याचे काम राज्य व केंद्र सरकार करीत आहे. जनधन योजनेतही भाजप सरकारने गोरगरीबांची लूट चालवली आहे. नुकतीच जातपडताळणी समित्या रद्द करण्याची घोषणा राज्य सरकारने केल्याचे सांगून या निर्णयाचा आपण निषेध करीत असल्याचे त्यांनी सांगितले. दीपक पाटील म्हणाले की, शेतकरी व सहकारविरोधी असणाºया या सरकारने सहकार मोडकळीस आणण्याचे काम केले आहे. शेतकºयांचे सातबारे आजही कोरे नाहीत. काँग्रेसला कोणीही हरवू शकत नाही, आपणच आपल्याला हरवतो त्यामुळे आपले घर आपणच सांभाळताना युवकांना जवळ केले पहिजे. ज्यांना आपले महत्व नाही त्यांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहनही त्यांनी केले. आमदार अ‍ॅड.के.सी.पाडवी म्हणाले की, उपसा सिंचन योजना पूर्ण होणे आवश्यक होते. रहाट्यावड धारणालाही अडचणी आणल्या जात असून विकासाच्या नावावर दिशाभूल केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. श्याम सनेर म्हणाले की, शेतकरी-कष्टकरी, जनतेच्या विकासासाठी सरकारकडे पैसे नाहीत. मात्र घोडेबाजारासाठी निधी आहे. पर्यटनाच्या नावाने त्याच निधीवर डल्ला मारुन जनतेला लुटण्याचे काम हे सरकार करीत असून पीक विमा कर्ज, गॅस अनुदान आदी योजनांच्या नावाने जनतेचा खिसा खाली करणाºया या सरकारला हद्दपार करण्याचे आवाहन त्यांनी केले. माणिकराव गावीत म्हणाले की, शेतकºयांसह सर्वसामान्य जनतेची केंद्र व राज्य सरकारकडून थट्टा सुरू आहे. आश्वासनांची खैरात वाटणाºया या सरकारला घरी बसविण्याची वेळ आल्याचे सांगितले. आमदार डी.एस. अहिरे, बापू चौरे यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन तालुका काँग्रेसचे अध्यक्ष किशोर मोरे यांनी केले.