ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि. 15 - पंतप्रधान उज्जवला गॅस योजनेत समाविष्ट लाभार्थीची प्रतीक्षा पुन्हा वाढली आह़े वितरकांनी अर्ज भरून देऊनही जिल्ह्यात फक्त एक हजार कनेक्शन वाटप झाले आहेत़ प्रत्यक्षात वितरकांनी 22 हजारापेक्षा अधिक पात्र अर्जाचा भरणा गॅस कंपन्यांकडे केला आह़े जिल्ह्यात सुरू असलेली उज्जवला गॅस योजना एकापेक्षा अनेक कारणांनी गाजत आह़े या योजनेतील सहा वितरकांवर इंडियन ऑईल कंपनीने कारवाई केली आह़े काय, कारवाई झाली ही माहिती संबधितांनी दिली नसली, तरी सहा वितरकांना नोटीसा देऊन केवळ समज देण्यात आली आह़े या वितरकांकडून पैसे घेतले जात असल्याचे आरोप करण्यात आल्यानंतर खासदार डॉ़ हीना गावीत यांनी दखल घेत, उज्जवला गॅस योजनेच्या राष्ट्रीय समन्वयकांना सूचित करून माहिती दिली होती़ यानंतरही मात्र कनेक्शन वाटपाला बसलेला खोडा कायम आह़े देशात दोन कोटी दारिद्रय़रेषेखालील महिलांना उज्जवला योजनेचा लाभ देण्यात आल्याचा दावा होत असला, तरी नंदुरबार जिल्ह्यात हा दावा पूर्णपणे फोल ठरत आह़े आतार्पयत जिल्ह्यात केवळ नवापूर, तळोदा आणि अक्कलकुवा यातीन तालुक्यात उज्जवलाचे कनेक्शन लाभार्थी महिलांना देण्यात आले आहेत़ नंदुरबार, शहादा आणि धडगाव येथील लाभार्थी महिलांना अजूनही गॅसची प्रतिक्षा आह़े नंदुरबार तालुक्यात एकही कनेक्शन देण्यात आलेली नसल्याची माहिती आह़े वितरकांनी त्यांना दिलेल्या जबाबदारीनुसार केवायसी असलेल्या अर्जाचा भरणा करून घेतला आह़े या अर्जाचे आधार लिकिंग व ऑनलाईन भरणार करण्यात आला आह़े तरीही तीन तालुक्यात लाभार्थी महिलांना गॅस कनेक्शन देण्यात आलेले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आह़े राज्यातील सर्वात कमी गॅस कनेक्शन असलेल्या दुस:या क्रमांकाचा जिल्हा असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात या योजनेचा वेग वाढण्याची अपेक्षा होती़ मात्र वाटप करण्याच्या कामांमध्ये सुधारणा होण्याऐवजी किरकोळ वाटपही होऊ शकलेले नाही़ जिल्ह्यात दोन लाख 10 हजार 279 शिधापत्रिका दारिद्रय़रेषेखालील आहेत़ दारिद्रय़ रेषेखालील महिला लाभार्थीच्या या याद्या ग्रामस्तरावरून थेट गॅस वितरकांर्पयत 10 महिन्यांपूर्वी पोहोचवण्यात आल्या होत्या़ त्यानंतर बहुतांश ठिकाणी लाभार्थी महिलांनी तात्काळ अर्ज भरून देत कागदपत्रांची पूर्तता केली होती़ वेगात सुरूवात झालेल्या योजनेतून तात्काळ गॅस मिळेल या आशेने या महिला दररोज वितरकांचे उंबरठे ङिाजवत आहेत़ वितरकांकडे याचे ठोस असे उत्तर नसल्याने त्यांचाही नाईलाज आह़े विशेष म्हणजे उज्ज्वला योजनेत जिल्ह्यातील साधारण पाच लाख दारिद्रय़रेषेखालील महिलांना आणून त्यांना गॅसचा लाभ देण्याची अपेक्षा लोकप्रतिनिधींकडून व्यक्त करण्यात आली होती़
नंदुरबार जिल्ह्यात उज्जवला लाभार्थीची प्रतीक्षा पुन्हा वाढली
By admin | Published: June 15, 2017 5:13 PM