शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
4
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
6
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
7
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
9
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
10
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
11
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
12
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
13
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
14
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
15
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
16
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
17
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
18
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
19
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
20
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."

नंदुरबार जिल्ह्यात पुरूषांची यंदा ‘नसबंदी’त पिछाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 12:22 PM

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नसबंदी शस्त्रक्रिया करून घेण्यात जिल्ह्यातील पुरूष यंदा पिछाडीवर असून महिला शस्त्रक्रियांचे उद्दीष्टय़ही निम्म्यावर आह़े गेल्या वर्षापासून आरोग्य केंद्रामध्ये नसबंदी आणि संततीनियमन शस्त्रक्रिया करणा:यांना आधारलिंकिंग सक्तीचे केले होत़े यात अनेकांनी आधार लिंक करून देखील प्रोत्साहन भत्ता न मिळाल्याचा अपप्रचार वाढून नसबंदी आणि संततीनियमन शस्त्रक्रियांवर परिणाम ...

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नसबंदी शस्त्रक्रिया करून घेण्यात जिल्ह्यातील पुरूष यंदा पिछाडीवर असून महिला शस्त्रक्रियांचे उद्दीष्टय़ही निम्म्यावर आह़े गेल्या वर्षापासून आरोग्य केंद्रामध्ये नसबंदी आणि संततीनियमन शस्त्रक्रिया करणा:यांना आधारलिंकिंग सक्तीचे केले होत़े यात अनेकांनी आधार लिंक करून देखील प्रोत्साहन भत्ता न मिळाल्याचा अपप्रचार वाढून नसबंदी आणि संततीनियमन शस्त्रक्रियांवर परिणाम झाला आह़े  लोकसंख्येवर नियंत्रण मिळवता यावे, यासाठी केंद्र सरकारकडून देशात संततीनियमन शस्त्रक्रिया करणा:या पुरूष आणि महिलांना प्रोत्साहन भत्ता वाटप करण्यात येत होता़ कालांतराने यात ब:यापैकी भ्रष्टाचार सुरू झाल्याने  यंत्रणा त्रस्त होती़ यातून पर्यायी मार्ग म्हणून गेल्यावर्षापासून शस्त्रक्रिया करण्यासाठी आधार लिंकिंग असलेले बँक खाते दिल्यानंतरच प्रोत्साहन भत्ता देण्यास प्रारंभ झाला होता़ हा भत्ताही बँकेत वेळेवर येत नसल्याने शस्त्रक्रिया करण्याबाबत उलटसुलट चर्चा रंगू लागल्या़ यातून महिला आणि पुरूषांनी या शस्त्रक्रिया करण्याकडे दुर्लक्ष केले आह़े एकीकडे भत्ता मिळत नसल्याची कोणतीही खातरजमा न करणा:या जिल्हा परिषद आरोग्य विभागानेही शिबिरे घेणे तसेच जनजागृतीपर कामकाज केले नाही़ यातून 2017-18 या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील केवळ 521 पुरूषांनी नसबंदी आणि 5 हजार 162 महिलांनी शस्त्रक्रिया करून घेतल्या आहेत़ शासनाकडून देण्यात आलेले उद्दीष्टय़ निम्मे पूर्ण करणा:या आरोग्य विभागाने यंदा शस्त्रक्रिया शिबिरे न भरवल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आह़े धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्याच्या दुर्गम भागात महिलांपेक्षा पुरूषांच्या शस्त्रकियांना सर्वाधिक प्राधान्य दिले जात असल्याने याठिकाणी जनजागृतीची गरज आह़े नंदुरबार जिल्हा आरोग्य विभागाला 2017-18 या आर्थिक वर्षात 931 पुरूषांची नसबंदी करण्याचे उद्दीष्टय़ देण्यात आले होत़े यापैकी 521 जणांनी नसबंदी करून घेतली़ यात नवापूर 19, शहादा 24, तळोदा 63, अक्कलकुवा 170 तर धडगाव तालुक्यात सर्वाधिक 243 पुरूषांनी नसबंदी करून घेतली़ जिल्ह्यात सर्वात कमी केवळ 2 पुरूषांनी नसबंदी केल्याची नोंद नंदुरबार तालुक्यात आह़े 59 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 290 उपकेंद्रांचे मोठे जाळे असूनही यंदा केवळ 5 हजार 162 महिला संततीनियमन शस्त्रक्रियांसाठी पुढे आल्या होत्या़ यात नंदुरबार 1 हजार 392, नवापूर 1 हजार 54, तळोदा 445, अक्कलकुवा 489 तर धडगाव तालुक्यात सर्वाधिक कमी 104 महिलांचा समावेश आह़े यातील बहुतांश महिला अद्यापही प्रोत्साहन भत्त्याच्या प्रतिक्षेत असल्याचे सांगण्यात आले आह़े याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ एऩडी़बोडके यांच्यासोबत चर्चा केली असता, त्यांनी सांगितले की, ब:याचवेळा शस्त्रक्रियेसाठी येणा:यांकडून बँक पासबुकची ङोरॉक्स आणि आधारकार्ड देण्यात दिरंगाई होत़े काहीवेळा खाते क्रमांक चुकीचे असल्याने भत्ते त्यांच्यार्पयत पोहोचत नाहीत़ याबाबत योग्य ती माहिती घेऊन भत्ते मार्गी लावले जातील़ चालू वर्षाच्या तुलनेत 2016-17 या वर्षाची आकडेवारी समाधानकारक आह़े याकाळात 1 हजार 125 पुरूषांच्या नसबंदी शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या होत्या़ तर 6 हजार 82 महिलांची संततीनियमन शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती़ वेळोवेळी सुरू असलेली शिबिरे, स्त्रीरोग तज्ञांकडून सातत्याने दिल्या जाणा:या भेटी यामुळे उद्दीष्टय़ाच्या 64 टक्के महिलांच्या तर 110 टक्के पुरूषांच्या शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आरोग्य विभागाने यश मिळवले होत़े आरोग्य विभागाकडून नसबंदी करणा:या पुरूषाना 1 हजार 100 तर संततीनियमन शस्त्रक्रिया करणा:या महिलेस केवळ 650 रूपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येतो़ या भत्त्याची रक्कम वाढवण्याची गरज असतानाही शासनाकडून कारवाई झालेली नाही़ किरकोळ अशी ही रक्कमही आधारलिंक केल्यानंतर खात्यावर वर्ग करण्यास चार-सहा महिन्यांचा कालावधी लागत असल्याने नाराजी आह़े आधारलिंकिंग बाबतचा अपप्रचार आणि शिबिर आयोजनाबाबत उदासिनता यानंतर स्त्रीरोग तज्ञांची रिक्त पदे व आरोग्य केंद्रांमधील असुविधा यामुळे लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रम जिल्ह्यात रखडला आह़े याबाबत कोणत्याही प्रकारे उपाययोजना करण्यात येत नसल्याने यंदा शस्त्रक्रियांचे उद्दीष्टय़ही आरोग्य विभागाला पूर्ण करता आलेले नसल्याचे स्पष्ट झाले आह़े संततीनियमन आणि शस्त्रक्रिया शिबिरांसाठी बाहेरील तज्ञ डॉक्टर बोलावणे तसेच विविध खर्चाचे अनुदान मिळत नसल्यानेही गेल्या वर्षात शिबिरांकडे वैद्यकीय अधिका:यांनी पाठ फिरवली होती़ यातही शिबिरांसाठी महिला आणि पुरूषांना तयार करणा:या आशा स्वयंसेविकांनाही वेळेवर भत्ते मिळत नसल्याच्या तक्रारी सातत्याने करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आह़े