नंदुरबार : उधना-जळगाव रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाअंतर्गत नंदुरबार ते दोंडाईचा या दुस:या लाईनची अंतिम चाचणी घेण्याचे काम शुक्रवार, 20 जुलैपासून सुरू करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाने यासाठी 20 व 21 हे दोन दिवस मेगा ब्लॉक घेतले आहेत. यामुळे या मार्गावरील अनेक गाडय़ा रद्द करण्यात आल्या असून लांब पल्ल्याच्या गाडय़ांना इतर मार्गानी वळविण्यात आले आहे. परिणामी या मार्गावरील प्रवाशांचे मोठय़ा प्रमाणावर हाल होत आहेत. दरम्यान, नंदुरबार ते सुरत एस.टी.बस आणि खाजगी वाहतुकीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. उधना ते जळगाव या 306 किलोमिटर लांबीच्या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम पुर्ण झाले आहे. शेवटच्या टप्प्यातील नंदुरबार ते दोंडाईचा या 30 किलोमिटर मार्गाचे काम देखील पुर्ण झाले असून रेल्वेच्या वरिष्ठ अधिका:यांच्या उपस्थितीत मे महिन्यात चाचणी देखील घेण्यात आली होती. आता सिग्नल, विद्युतीकरण आणि इतर तांत्रिक कामांची चाचणी घेण्यात येत आहे. त्यासाठी शुक्रवार व शनिवारी मेगा ब्लॉक घेण्यात येवून अंतिम चाचणी घेण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी या मार्गावरील सर्वच प्रवासी व मालवाहू गाडय़ा प्रभावीत झाल्या आहेत.चाचणीला सुरुवातनंदुरबार ते दोंडाईचा या मार्गावरील अंतिम चाचणीला शुक्रवारी सकाळपासून सुरुवात करण्यात आली. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असतांनाही सर्व तांत्रिक बाबींची तपासणी करण्यात आले. विद्युतीकरण पुर्ण झालेले आहे. परंतु ट्रॅक आणि विद्युतीकरण यांची चाचणी घेण्यासाठी या मार्गावर 120 किलोमिटर प्रतीतास या वेगाने रेल्वे चालविण्यात आली. ती चाचणी देखील यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले. यासाठी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. शनिवारी देखील दिवसभर ही चाचणी घेतली जाणार आहे. रविवारी हा मार्ग सामान्य प्रवासासाठी खुला होणार आहे.औपचारिक उद्घाटननवीन अर्थात दुस:या रेल्वे मार्गाचे उद्घाटन लवकरच रेल्वेमंत्री किंवा राज्यमंत्री यांच्या हस्ते करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. शक्य झाल्यास पंतप्रधानांना देखील बोलविण्याची तयारी असल्याचे सांगण्यात येत आहे. अर्थात उद्घाटन उधना येथे की जळगाव येथे होते याकडे लक्ष लागून आहे. मिळालेल्या महितीनुसार दोंडाईचा किंवा नंदुरबार येथे देखील हा कार्यक्रम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.दोन पॅसेंजर रद्दसुरत-भुसावळ (59013) व भुसावळ-सुरत पॅसेंजर (59014) ही खान्देशातील प्रवाशांसाठी अतिशय जिव्हाळ्याची रेल्वे पॅसेंजर दोन्ही दिवस रद्द करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांचे मोठय़ा प्रमाणावर हाल झाले. सुरत-नंदुरबार पॅसेंजरला उकई-सोनगडर्पयत सोडण्यात आले तर नंदुरबार-सुरत पॅसेंजर देखील उकई-सोनगडर्पयतच सोडण्यात आली होती. सुरत-भुसावळ पॅसेंजरला (59013, 12844, 18402, 18406, 16506) बारडोली, व्यारा, दोंडाईचा व अमळनेर येथे अतिरिक्त वेळेत थांबा देण्यात आला आहे.प्रवाशांचे हालअनेक प्रवासी रेल्वेगाडय़ा वळविण्यात आल्याने किंवा रद्द झाल्याने या मार्गावरील प्रवाशांची मोठय़ा प्रमाणावर हाल झाली. काही प्रवाशांना याबाबत माहिती नसल्यामुळे रेल्वे स्थानकावर येवून त्यांना परत फिरावे लागत होते. त्यामुळे बसस्थानक आणि खाजगी ट्रॅव्हल्सच्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली होती. सुरतकडे जाणा:या सर्वच एस.टी.बसेस आणि खाजगी वाहने प्रवाशांनी भरून जात होते. शनिवारी देखील हीच स्थिती राहणार असल्यामुळे एस.टी.प्रशासनाने प्रवासी संख्या पाहून अतिरिक्त बसेस सोडण्याबाबत निर्णय घेणार आहे.
नंदुरबार-दोंडाईचा : दुहेरीकरणाची अंतिम चाचणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:46 PM