नंदुरबार : सध्या नंदुरबारातील विविध घाटमाथ्यांवर पावसाची रिपरिप सुरू आह़े सतत पावसाची संततधार सुरू असल्याने परिणामी घामार्गावर मोठय़ा प्रमाणात चिखल झाला असल्याने घाटमार्ग चिखलाने माखले आहेत़ विशेष म्हणून या मार्गावरुन एसटी बसफे:यासुध्दा बंद असल्याची माहिती देण्यात आली आह़े त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने याकडे लक्ष देत उपाय योजना करण्याची मागणी आह़ेसोनगीर-दोंडाईचा राज्य महामार्गावरील शहादा-धडगाव घाट, रोषमाळ-धडगाव घत्तट, कोठार-तळोदा घाट, मोलगी-डाब-अक्कलकुवा घाट, चांदसैली घाट आदी घाटांमध्ये संपूर्ण ठिकाणी चिखल निर्माण झाला आह़े त्यामुळे अत्यंत निमुळत्या असलेल्या या मार्गावरुन एसटी बससह इतर वाहने चालवनेसुध्दा कठीण झाले आह़े त्यामुळे या मार्गावरुन अनेक जण जायबंदी झाले आहेत़असुरक्षितता वाढलीघाटमार्गावर संरक्षक कठडे नसल्याने या ठिकाणाहून वाहतूक करणे अत्यंत कठीण होत आह़े दरम्यान, प्रशासनाकडून दरडप्रणव क्षेत्रांवर बाधलेल्या संरक्षक भिंतीमुळे काहीसा दिलासा मिळत असला तरी, अनेक मार्गावर दरड कोसळत असल्याची स्थिती कायम आह़े जल्ह्यात अनेक अवघड क्षेत्र असल्याने या ठिकाणी संबंधित प्रशासनाने उपाय योजना करणे गरजेचे आह़े घाटमार्गावर आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे त्वरित कार्यवाही करणे गजरेचे आह़े मोलगी-डाब-अक्कलकुवा हा घाट अत्यंत धोकेदायक ठरत आह़े त्याच प्रमाणे चांदसैली घाटावरसुध्दा मोठय़ा प्रमाणावर दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत़ घाटमार्गावरुन अनेक पर्यटक जात आहेत़ त्या शिवाय या ठिकाणी दरड, चिखलासह अनेक अडथळे निर्माण झालेले आहेत़ याचा परिणाम वाहतुकीवर झालेला दिसून येत आह़े अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचे दिसून येत आह़े सध्या सर्वत्र निसर्ग बहरला असल्याने जिल्ह्यातील पर्यटकांचा ओढा घाटमाथ्यावर वाढताना दिसून येत आह़े त्यामुळे साहजिकच वाहनांची वर्दळ वाढली आह़े शहरी तसेच ग्रामीण भाग वगळता नंदुरबारातील उंचावर असलेल्या घाटमाथ्यावर मोठय़ा प्रमाणात पावसाची संततधार कायम आह़े घाटमाथ्यावरी हे पाणी ङिारपत रस्त्याच्या बाजूला असलेल्या डोंगर-द:यांमधून वाहत आह़े आपल्यासोबत डोंगरावरील मातीही वाहून आणत असल्याने घाटमार्गावर मोठय़ा प्रमाणावर चिखल निर्माण झाला आह़े या चिखलातून वाट काढणे अनेकांना कठीण जात असून दुचाकी वाहने ‘स्लीप’ होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आह़े
नंदुरबारातील घाटमार्ग चिखलाने माखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:39 PM