शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

नगराध्यक्ष निवडणुकीसाठी नंदुरबारला सर्वाधिक 16 अजर्, नवापूरात 10 तर तळोद्यात सात अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 12:35 PM

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबारसह नवापूर व तळोदा पालिकांच्या थेट नगराध्यक्षांच्या निवडणुकीत नंदुरबार व तळोद्यात काँग्रेस व भाजप यांच्यात सरळ सामना होणार असून नवापूरात काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप अशी तिरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर नंदुरबारात एकुण 16, नवापूरात 10 तर तळोदा पालिकेत सात जणांनी अर्ज ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबारसह नवापूर व तळोदा पालिकांच्या थेट नगराध्यक्षांच्या निवडणुकीत नंदुरबार व तळोद्यात काँग्रेस व भाजप यांच्यात सरळ सामना होणार असून नवापूरात काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप अशी तिरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर नंदुरबारात एकुण 16, नवापूरात 10 तर तळोदा पालिकेत सात जणांनी अर्ज दाखल केले. दरम्यान, शनिवारी 25 रोजी अर्जाची छाननी होणार आहे. थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तिन्ही पालिकांमध्ये मोठय़ा प्रमाणावर इच्छूकांनी अर्ज दाखल केले. सर्वच प्रमुख पक्षांसह इतर लहान, मोठे पक्ष आणि अपक्षांचा देखील मोठा भरणा आहे. माघारीनंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.नंदुरबारात सरळ लढतीची शक्यतानंदुरबार पालिकेत एकुण 16 अर्ज दाखल झाले असले तरी खरी लढत काँग्रेसच्या र}ा चंद्रकांत रघुवंशी व भाजपचे डॉ.रवींद्र मराठे यांच्यात होण्याची शक्यता आहे. गुरुवारी काँग्रेसच्या र}ा रघुवंशी, राम रघुवंशी यांच्यासह अपक्ष म्हणून प्रकाश भोई व राकेश मराठे यांनी अर्ज दाखल केले होते. शुक्रवारी भाजपतर्फे डॉ.रवींद्र हिरालाल चौधरी यांनी अर्ज दाखल केला. याशिवाय समाजवादी पक्षातर्फे फकिर दिलावरशाह कादरशाह, राष्ट्रीय समाज पक्षातर्फे पुष्पा प्रवीण थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शेख अरिफ कमर  तर एमआयएमतर्फे शेख रफअत हुसेन सदाकत हुसेन यांचा समावेश आहे. याशिवाय पाच अपक्षांनी देखील अर्ज दाखल केले आहेत. माघारीच्या शेवटच्या क्षणार्पयत कोण काय निर्णय घेतो यावर देखील बरेच काही अवलंबून राहणार आहे.नवापूरात तिरंगी सामना रंगण्याची शक्यता नवापूरात तिरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे. येथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप असा सामना होणार आहे. काँग्रेसतर्फे तिघांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यात दिपीका हेमंत पाटील, शाह सुरैबा फारूक व हेमलता अजय पाटील यांचा समावेश आहे. यापैकी कुणाला उमेदवारी निश्चित होते  याकडे लक्ष लागून आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अर्चना वळवी यांनी अर्ज दाखल केलेला आहे. भाजपतर्फे ज्योती दिपचंद जयस्वाल व शैला भिकाजी टेंभे यांनी अर्ज दाखल केलेले आहेत, याशिवाय नवापूर विकास आघाडीतर्फे सोनल धर्मेद्र पाटील, समाजवादी पक्षातर्फे शेख अज्मीना जावेद व बहुजन समाज पार्टीतर्फे संगिता सावरे यांनी देखील उमेदवारी दाखल केली आहे. तळोद्यात काँग्रेस-भाजप आमने सामनेतळोद्यात काँग्रेस व भाजप अशी सरळ लढत राहण्याची शक्यता आहे. काँग्रेसतर्फे भरत माळी व रोहित भरत माळी यांनी आज तर जितेंद्र सूर्यवंशी यांनी काल अर्ज दाखल केले आहेत. भाजपतर्फे अजय परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे देवेश जोहरी यांनी अर्ज दाखल केले आहेत. भरत माळी व अजय परदेशी यांच्यातच खरा सामना रंगणार आहे.शनिवार, 25 रोजी तळोदा, नवापूर व नंदुरबार येथील तहसील कार्यालयातील निवडणूक कक्षात दाखल अर्जाची छाननी होणार आहे. 30 नोव्हेंबर्पयत माघारीची मुदत आहे. त्यामुळे त्याच दिवशी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचे खरे चित्र समोर येणार आहे.