शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
2
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
3
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
4
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
5
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
6
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
7
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
8
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
9
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
10
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
11
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
12
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
13
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
14
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
15
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
16
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
17
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
18
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
19
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
20
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज

गाडी लावण्याच्या वादातून नंदुरबारात मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 12:33 PM

एकजण जखमी : परस्परविरोधी गुन्हे दाखल

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 4 : रस्त्यावर वाहने लावण्याच्या कारणावरून नंदुरबारात दोन गटात हाणामारी झाली. यात एकजण गंभीर जखमी झाला असून परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. शहरातील हिरो शोरूमच्या पाठीमागील भागात राहणारे नरेंद्र बाबुराव शिंदे व कल्पेश गौतमचंद जैन यांच्यात हा वाद झाला. कॉलनीतील लोकं रस्त्यावर कशाही पद्धतीने          वाहने उभी करीत असल्यामुळे आपल्या मुलाला घेण्यासाठी येणारी स्कूलबस कॉलनीत येवू शकत नाही. त्यामुळे मुलाला लांब सोडण्यासाठी जावे लागते. कॉलनीतल्या लोकांनी वाहने शिस्तीने लावावी असे सांगण्यास गेलेल्या नरेंद्र शिंदे यांना त्यांच्याच कॉलनीतील कल्पेश गौतमचंद जैन, धिरज गौतमचंद जैन, महावीर गुलाबचंद जैन, अमित मुकेश गोशल्या यांनी हाताबुक्यांनी व लोखंडी फाईटरने जबर मारहाण  केली. शिवाय त्यांच्या खिशातील           18 हजार रुपये तीन तोळे सोन्याची चेन जबरीने काढून घेतल्याची           फिर्याद शिंदे यांनी दिली आहे. त्यावरून जैन बंधू व गोशल्या यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी फिर्याद गौतम पारसमल जैन यांनी दिली. अंगणात गाडी लावण्याच्या वादातून राजेंद्र बाबुलाल शिंदे व नरेंद्र बाबुलाल शिंदे यांनी बेदम मारहाण केली. तसेच खिशातील 20 हजार रुपये रोख व 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन जबरीने चोरून  घेतल्याचे फिर्यादीत जैन यांनी नमुद केले आहे. त्यावरून शिंदे बंधूविरूद्ध उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक सुनील बच्छाव करीत आहे.दरम्यान, किरकोळ कारणावरून झालेल्या या हाणामारीमुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती.