शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
3
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
4
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
6
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
7
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
8
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
9
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
10
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
11
धक्कादायक! ‘लिव्ह-इन पार्टनर’चे केले ५० तुकडे अन् प्राण्यांना खाण्यासाठी टाकले
12
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
13
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
14
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
15
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
16
मलिकांवरील गुन्ह्याच्या तपासाची माहिती द्या; उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश
17
मनसेच्या पराभूत उमेदवारांना राज ठाकरेंनी दिली उमेद; अडचणी समजावून घेत साधला संवाद
18
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
19
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...

नंदुरबारातील कुपनलिका, विहिरी ठरताय निरुपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 11:35 AM

नंदुरबार : दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढतच आहे. शेतातील कुपनलिका व विहिरी चार महिन्यांपासून कोरड्या पडल्याने शेतकरी त्यातील विद्युत मोटारी ...

नंदुरबार : दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढतच आहे. शेतातील कुपनलिका व विहिरी चार महिन्यांपासून कोरड्या पडल्याने शेतकरी त्यातील विद्युत मोटारी व इतर विद्युत साहित्य काढून घेत आहेत. पावसाळ्यानंतरच अर्थात जुलै, आॅगस्ट महिन्यातच आता विद्युत मोटारी टाकल्या जाणार आहेत. दरम्यान, शेतांमधील विद्युत साहित्य आणि शेती साहित्य चोरीच्या घटना वाढल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत.जिल्ह्यात यंदा सरासरीचा केवळ ६८ टक्के पाऊस झाला आहे. नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात तर सरासरीचा केवळ ४५ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे भुगर्भातील पाणी पातळी कमालीची खोल गेली आहे. रब्बी हंगामाला देखील त्याचा फटका बसला आहे. पिण्याला पाणी नाही तर पिकांना कुठून पाणी देणार या विवंचनेत शेतकरी आहेत. परिणामी विहिरी व कुपनलिका केवळ शोभेच्या वस्तू म्हणून उरल्या आहेत. शेतांमध्ये सर्वत्र उजाड दिसून येत आहे.विहिरींमध्ये ठणठणाटनंदुरबार तालुक्यातील खोंडामळी, कोपर्ली, रनाळे, भालेर या परिसरात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी व कुपनलिका कोरड्या पडल्याने खाजगी विहिर व विंधन विहिर अधिग्रहण प्रशासनाकडून केले जात आहे. परंतु भुगर्भातच पाणी नाही तर विहिरी व विंधनविहिरींना कुठून पाणी येणार ही समस्या आहे. त्यामुळे अधिग्रहण करून देखील उपयोग नसल्याची स्थिती आहे.परिणामी पाण्याची बिकट समस्या निर्माण झाली आहे. ग्रामस्थ व शेतकरी मिळेल त्या ठिकाणाहून पाणी मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.विद्युत मोटारी काढल्यायंदा सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यातच कुपनलिका व विहिरी कोरड्या पडल्याने त्या गेल्या चार ते पाच महिन्यांपासून बंद अवस्थेत आहेत. अशा ठिकाणांहून चोरटे मोटारी व केबल चोरून नेत आहेत. परिणामी शेतकºयांवर दुहेरी संकट ओढावत आहे. ही बाब लक्षात घेता बंद पडलेल्या कुपनलिका व विहिरींमधून आता शेतकरी विद्युत मोटर व केबल काढून घरी आणत आहेत.आणखी किमान सहा ते सात महिने कुपनलिका किंवा विहिरींना पाणी येणे शक्य नाही. जुन किंवा जुलै महिन्यात दमदार पाऊस झाला तरच भुगर्भातील पाणी पातळी वाढून त्यांना पाणी येणार आहे.