नंदुरबार - नंदुरबारलोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार डॉ़ हिना गावीत यांनी चांगलीच मुसंडी मारली आहे़. त्यांनी तब्बल 40 हजार 607 मतांची आघाडी घेतली आहे. अॅड़ के़सी़ पाडवी यांना 3 लाख 54 हजार 695 तर डॉ़ हिना गावीत यांना 3 लाख 95 हजार 303 इतकी मत मिळाली आहेत. एकूण २७ फेऱ्या होणार आहेत़ दरम्यान, सकाळी 8 वाजेपासून सुरुवातीला टपाली मतदान प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती. सातव्या फेरीपर्यंत दुपारी 12 वाजेपर्यंतची ही निकालाची आकडेवारी आहे.
काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या डॉ. हिना गावित आणि काँग्रेसच्या अॅड. के.सी. पाडवी यांच्यात मुख्य लढत होत आहे. 1951 पासून 2014 पर्र्यंत या मतदारसंघात काँग्रेसचाच उमेदवार विजयी झाला आहे. तर, गतवर्र्षीच्या म्हणजेच 2014च्या निवडणुकीत पहिल्यांदाच कमळ उमललंल होतं. या यशाची पुनरावृत्ती डॉ. हिना गावित करतात, की के सी पाडवी .काँग्रेसला पुन्हा अच्छे दिन दाखवतात, याबद्दल उत्सुकता आहे.
पहिल्या टप्प्यात पार पडललेल्या विदर्भातील नंदुरबार लोकसभा मतदारसंघात डॉ. हिना गावित यांच्या उमेदवारीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. हिना गावित आणि अॅड. केसी पाडवी यांच्यातील मुख्य लढतीत नंदुरबारमध्ये कोण गुलाल उधळणार याची उत्सुकता महाराष्ट्रातील जनतेला लागली आहे. पहिल्या फेरीनंतर अॅड.केसी पाडवी यांनी आघाडी घेतली होती.त्यामुळे हिना गावित यांची सीट धोक्यात असल्याच मानन्यात येत होते. गेल्या निवडणुकीत हिना गावित यांनी 5 लाख 79 हजार 486 मतं घेत विजय मिळवला होता. मात्र, काही वेळातच चित्र बदलल्याचे दिसून येत आहे. गावित यांना पहिल्या फेरीतील पिछाडीनंतर पुन्हा मोठी आघाडी मिळाली आहे. जवळपास 40 हजार मतांनी आघाडी घेत हीना गवीत पुन्हा एकदा खासदार बनण्याकडे वाटचाल करताना दिसत आहेत. दरम्यान, नंदुरबार मतदारसंघात एकूण 18 लाख 70 हजार 117 मतदार असून नंदुरबारमध्ये 68.33 टक्के मतदान झाले आहे. नंदुरबार येथील खोडाई माता रस्त्यावरील वाहतूक इतरत्र वळविण्यात आली होती. मतदान केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे़.