ठळक मुद्देगतवर्षी 12 कोटी रूपयांची वसुली
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पालिका निवडणूकीपूर्वी संथगतीने सुरू असलेल्या कर भरणा प्रक्रियेस गती आली असून 24 नोव्हेंबर्पयत पालिकेच्या तिजोरीत तीन कोटी रूपये आले आह़े बिल वाटपापूर्वीच रक्कम जमा होण्यास सुरूवात झाल्याने यंदा वसूलीचे टार्गेट पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े शहरातील मालमत्ताधारकांकडून घरपट्टी, पाणीपट्टी आणि इतर करांची वसुली करण्यात येत़े करांची वसुली करण्यासाठी पालिका वसुली विभाग बिल पाठवत़े यंदा बिल पाठवण्यास वेळ असतानाच भरणा सुरू झाले आह़े पालिका प्रशासनाकडून नोव्हेंबर महिन्यात नागरिकांना कर भरण्यासाठी आवाहन करून बिले पाठवण्यात येतात़ मार्चअखेर्पयत करांचा भरणा करण्याची आवश्यकता असत़े यंदा 1 नोव्हेंबरपासून पालिका प्रशासनाने नागरिकांना केवळ तोंडी सूचना केल्यानंतरच वसुली होत आह़े पालिका प्रशासन येत्या आठ दिवसांनंतर घरोघरी बिलांचे वाटप करणार असल्याची माहिती आह़ेनंदुरबार पालिका : निवडणूकीमुळे घरपट्टी, पाणीपट्टी भरण्यास वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:11 PM