लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 21 : जिल्ह्यातील गुजरातच्या सिमावर्ती भागातील अनेक गावांना शनिवारी सायंकाळी भुकंपाचे हलके धक्के जाणवले. भुकंपाचा केंद्र भरूच येथे होते. तेथे 4.6 रिक्टर स्केलची नोंद करण्यात आली. दरम्यान, भुकंपामुळे कुठेही जिवीत किंवा वित्त हाणी झाली नाही. जिल्ह्यात त्याची तीव्रता सौम्य असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी दिली.शनिवारी सायंकाळी नवापूर, नंदुरबार शहरासह गुजरातच्या सिमावर्ती भागातील अनेक भागात भुकंपाचे धक्के जावणले. नंदुरबार व परिसरात 4 वाजून 52 ते 56 मिनिटांदरम्यान हे धक्के जाणवले. नवापूर तालुक्यातील काळंबा गावातील अविनाश बि:हाडे यांच्या घराच्या भिंतीला या भुकंपामुळे तडा गेल्याचे सांगण्यात आले. भुकंपाच्या धक्याची जाणीव होताच अनेकांनी एकमेकांना विचारणा केली. सोशल मिडियाच्या माध्यमातून माहिती जाणून घेण्याचा अनेकांनी प्रय} केला.भुकंपाचा केंद्रबिंदू गुजरातमधील भरूच येथे असल्याचे गांधीनगर येथील भुकंप नोंद केंद्रातर्फे सांगण्यात आले. तेथे 4.6 रिक्टर स्केलची नोंद करण्यात आली. सरदार सरोवर प्रकल्पाअंतर्गत एकुण नऊ ठिकाणी भुकंप नोंदणी केंद्र आहे. त्यात सावळदा, ता.शहादा येथेही केंद्र आहे. पूर्वी तेथे नोंदी घेतल्या जात होत्या. आता सर्व नऊ केंद्राच्या नोंदी या गांधीनगर येथे घेतल्या जातात. दरम्यान, जिल्ह्यात भुकंपाची तीव्रता फारशी नव्हती. केवळ सौम्य धक्के जाणवले. नंदुरबार, नवापूरसह सर्व तहसीलदारांना याबाबत माहिती घेण्याचे सुचीत करण्यात आले आहे. कुठलीही जिवीत किंवा वित्त हाणी झालेली नाही. नागरिकांनी देखील अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी सांगितले.
नंदुरबार, नवापूरात भुकंपाचे सौम्य धक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 7:17 PM