ठळक मुद्देएसटीचे जादा फे:यांचे नियोजन
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दुहेरीकरणाच्या कामामुळे रेल्वेने गुरूवारपासून पॅसेंजर गाडय़ा रद्द केल्याने प्रवाशी बसेसचा आधार घेत आहेत़ यात वेळेवर बसेस मिळत नसल्याने प्रवाशांचे हाल होत असून प्रवासात अडचणींचा सामना त्यांना करावा लागत आह़े भुसावळ-सुरत रेल्वे मार्ग दुहेरीकरणाच्या कामामुळे 19 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत पश्चिम रेल्वे व पाळधीदरम्यान मेगा ब्लॉक करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आह़े यानुसार गुरूवारी दुपारी दोन्ही पॅसेंजर गाडय़ा रद्द झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाल़े पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक ए़क़ेगुप्ता तसेच मुंबई मंडळाचे रेल्वे प्रबंधक मुकूल जैन यांनी नुकताच रेल्वे दुहेरीकरणाच्या कामाचा आढावा घेतला होता़ यानुसार शिल्लक असलेले दुहेरीकरणाचे काम तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या़ मिळालेल्या आदेशानुसार रेल्वे अधिका:यांनी विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्यास घेतले असून यासाठी मेगा-ब्लॉक होणार आह़े यानुसार 59013 सुरत-भुसावळ पॅसेंजर, 59014 भुसावळ-सुरत पॅसेंजर 16 ते 21 नोव्हेंबर रद्द करण्यात आली आह़े तसेच 19025 सुरत-अमरावती पॅसेंजर 19 नोव्हेंबर रोजी तर 19026 अमरावती सुरत पॅसेंजर 20 नोव्हेंबर रोजी रद्द करण्यात आली़ 16 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत सुरत-भुसावळ पॅसेंजर केवळ नंदुरबार्पयतच धावणार आह़े सुरतहून दररोज रात्री 11़30 वाजता भुसावळकडे रवाना होणा:या रेल्वेगाडय़ा रद्द झाल्याने पश्चिम रेल्वेने अहमदाबाद-पुरी एक्सप्रेस, ओखापुरी एक्सप्रेस, अहमदाबाद-पुरी एक्सप्रेस, अहमदाबाद-यशवंतपूर एक्सप्रेस या गाडय़ांना 16 ते 21 दरम्यान धरणगाव, अमळनेर, व्यारा आणि बारडोली या स्थानकांवर थांबा देण्यात आला आह़े पॅसेंजर गाडय़ा रद्द झाल्याने प्रवाशांची मोठी तारांबळ उडत असून गुजरात राज्यात जाणारे व येणा:या प्रवाशांना बसेस आणि खाजगी प्रवासी वाहनांचा आधार घ्यावा लागत आह़ेरेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे नंदुरबारातील प्रवाशांची अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 11:43 AM