ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 24 : शुक्रवार 25 रोजीपासून नंदुरबार-पुणे स्लिपर कोच ‘शिवशाही’ सुरु करण्यात येत असल्याची माहिती आगारप्रमुख नीलेश गावीत यांनी दिली़ रोज रात्री नंदुरबार-पुणे शिवशाही रात्री 8 वाजता तर, पुणे-नंदुरबार रात्री साडेनऊ वाजता असेल़शिवशाही सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आली असून तिचे भाडे 972 ऐवढे आकारण्यात येणार आह़े शहादा येथून निघणारी शिवशाही दोंडाईचा, धुळेमार्गे जात होती़ त्यामुळे नंदुरबारसाठीही नंदुरबार-पुणे स्लिपर कोच शिवशाही सुरु करावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती़ त्यानुसार एसटी महामंडळाकडून शिवशाही सुरु करण्यात आली आह़ेनंदुरबार, साक्री, सटाणा, नाशिक, संगमनेर व पुणे असा जाण्याचा मार्ग राहिल तर, परत येताना सुध्दा पुणे, संगमनेर, नाशिक, सटाणा, साक्री व नंदुरबार असा मार्ग राहणार आह़े दरम्यान, नंदुरबार-पुणे स्लिपर कोच शिवशाहीमध्ये खाजगी आरामदाय बसप्रमाणे सर्व आधुनिक सोयी-सुविधा देण्यात आल्या आहेत़ संपूर्ण वातानुकूलीत बस, मोबाईल चाजर्र पोर्ट, जीपीएस ट्रॅकिंग सुविधा, अग्निशमन बंब, एअर सस्पेंशन आदी विविध सुविधा देण्यात आल्या आहेत़ यामुळे समाधान व्यक्त होत आह़े
शुक्रवारपासून नंदुरबार-पुणे स्लिपर कोच बससेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:59 PM