नंदुरबार : नंदुरबार येथील रेल्वे स्थानकावरील ‘आरआयआय पॅनल’ एकमेकांना मॅच होत नाही, रेल्वे क्रॉसिंग तसेच धोक्याच्या सिंग्नलसाठी ही व्यवस्था अत्यंत महत्वाची असतानादेखील स्थानिक लोको पायलट तसेच अधिकाऱ्यांना याचे गांभीर्य नाही, अधिकारी आपसात संवादच साधत नसल्याने संतापलेल्या चर्चगेट येथील चिफ सेफ्टी आॅफीसर मनोज शर्मा यांची स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले़सोमवारी सकाळीच नंदुरबार येथील रेल्वे स्थानकाची चर्चगेट येथील पश्चिम रेल्वेच्या सुरक्षा अधिकाºयांकडून अचानक पाहणी करण्यात आली़ या आढावा दौºयाबाबत गाफील असलेले स्थानिक रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांची ऐनवेळी झालेल्या सुरक्षा तपासणीमध्ये चांगलीच भंबेरी उडाली होती़ या पथकामध्ये चिफ सेफ्टी आॅफीसर मनोज शर्मा, एडीआरएम खुशाल सिंग, चर्चगेट येथील पश्चिम रेल्वेचे रिजनल सर्विस इंजिनीअर संजय अग्रवाल यांसह डझनभर अधिकाºयांचा ताफा सकाळी १० वाजेच्या दरम्यान नंदुरबार येथील रेल्वे स्थानकावर धडकला होता़ थेट चर्चगेट येथील पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयातून येत संबंधित अधिकाºयांनी नंदुरबार रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचा आढावा घेतला़लोको पायलट कक्षाला भेटसेफ्टी आॅफिसर मनोज शर्मा यांनी एडीआरएम खुशाल सिंग यांच्यासह नंदुरबार स्थानकावरील लोको पायलट कक्षाला भेट दिली़ यात, आरआयआय पॅनल व्यवस्थेचा त्यांनी आढावा घेतला असता दोन्ही पॅनल ऐकमेकांना मॅच करीत नसल्याचे या वेळी लक्षात आहे़ रेल्वे क्रॉसिंग, रेल्वे ब्लॉकेजेस, धोक्याच्या सिंग्नल व्यवस्थेचे काम हे आरआयआय पॅनलव्दारे करण्यात येत असते़ परंतु गेल्या अनेक दिवसांपासून हे पॅनल मॅच होत नसल्याचे आढळून आले आहे़ परंतु विशेष म्हणजे, याबाबत कुठलीही तक्रार स्थानिक लोको पायलट तसेच इतर अधिकाºयांकडून वरिष्ठ कार्यालयाला करण्यात आलेली नव्हती़किंबहुणा या समस्येकडे स्थानिक अधिकाºयांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून आले होते़ कर्मचाºयांचा आपसामध्ये सुसंवाद नसल्यामुळे अशा घटना होत असल्याचे त्यांनी सांगितले़ सुमारे एक तास मनोज शर्मा व खुशाल सिंग यांनी लोको पायलट कक्षात थांबून इतर सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला़ त्याच प्रमाणे त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेले इतर कागदपत्रे तसेच जुने रेकॉर्डदेखील तपासलेत़पाहुणचार करुन अधिकाºयांना खूश करण्याचा प्रयत्नचर्चगेट येथील सुरक्षा अधिकाºयांच्या पथकाने नंदुरबार येथील रेल्वे स्थानकाला भेट देऊन अचानक पाहणी केल्याने स्थानिक रेल्वे अधिकाºयांची चांगलीच धावपळ उडाली़ बाहेरुन आलेल्या वरिष्ठ अधिकाºयांचा चांगला पाहुणचार करण्यासाठी त्यांच्यासाठी रबडी, रसमलाई, काजू, बदाम, पिस्ते, खमन, गुलाबजाम आदी विविध पदार्थांची रेलचेल होती़दरम्यान, रेल्वे स्थानकाची पाहणी झाल्यानंतर संबंधित अधिकाºयांनी स्थानकावरील लोको पायलट, इंजिनीअर तसेच इतर टेक्नीकल विभागात काम करणाºया अधिकारी व कर्मचाºयांची बैठक घेतली़ यात त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या़ तसेच रेल्वे सुरक्षेच्या दृष्टीने स्थानिक पातळीवर काही बदल शक्य आहेत काय? याबाबत त्यांची मते जाणून घेतली़पश्चिम रेल्वे मार्गावरील नंदुरबार रेल्वे स्थानकाचीच सर्वप्रथम पाहणी करण्यात आली होती़ त्यानंतर संबंधित रेल्वे अधिकाºयांनी भुसावळ-सुरत पॅसेंजरच्या शेवटी एक बोगी जोडून सूरतकडे मार्गक्रमण केले होते़ यात त्यांनी रेल्वे रुळाच्या सुरक्षेचीही पाहणी केली़
ढिसाळ सुरक्षा व्यवस्थेमुळे नंदुरबार रेल्वे अधिकारी धारेवर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 11:41 AM