शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

नववर्ष स्वागतासाठी नंदुरबारकर सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 2:32 PM

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी करण्यात आली आहे. अनेकांनी विधायक उपक्रमांना प्राधान्य दिले आहे तर काहींनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी विविध कामांचा शुभारंभ करण्याचे निश्चित केले आहे. दरम्यान, मद्य पिऊन वाहन चालविणा:यांवर कारवाईचा इशारा पोलीस दलाने दिला आहे. दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य सेवनाचे एका ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी करण्यात आली आहे. अनेकांनी विधायक उपक्रमांना प्राधान्य दिले आहे तर काहींनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी विविध कामांचा शुभारंभ करण्याचे निश्चित केले आहे. दरम्यान, मद्य पिऊन वाहन चालविणा:यांवर कारवाईचा इशारा पोलीस दलाने दिला आहे. दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य सेवनाचे एका दिवसाचे 20 हजार परवाने वितरीत केले आहेत.रविवार सुटीचा दिवस आणि 31 डिसेंबर हा योगायोग जुळून आल्याने हा दिवस साजरा करण्यासाठी अनेकांनी अनेक प्रकारे नियोजन करून ठेवले आहे. शहरातील विविध हॉटेल्स, धाबे यांच्यात ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी अनेक फंडे वापरण्यात येत आहेत. नागरिकांचा, युवकांचा उत्साहाला आवर घालण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस विभागाने देखील विविध उपाययोजना केलेल्या आहेत. दुसरीकडे महसूल वाढीसाठी दारूबंदी विभागाने मात्र जवळपास 20 हजार एकदिवशीय परवाने वितरीत करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. हॉटेल्स, धाब्यांवर तयारीशहरासह जिल्ह्यातील अनेक धाबे, हॉटेल्स यावर 31 डिसेंबर रोजी होणा:या जेवनावळींसाठी, पार्ट्ीसाठी सज्जता ठेवण्यात आली आहे. काही ठिकाणी संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले आहे. ठराविक बिलावर सुट देण्याचे अमिषही ग्राहकांना दाखविण्यात आले आहे. दररोजपेक्षा अतिरिक्त अर्थात जादा टेबलांचे नियोजनही अशा हॉटेल्स व धाब्यांवर करण्यात आले आहे. विद्युत रोषणाईसार्वजनिक इमारती, व्यापारी प्रतिष्ठाने तसेच काही धार्मिक ठिकाणांवर नववर्षानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. काही ठिकाणी नाताळ आणि नववर्ष याचा संगम साधत विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला आहे.सामाजिक उपक्रमही..नववर्षाचे स्वागत सामाजिक उपक्रमांद्वारे आयोजित करण्याचे नियोजन देखील काही संस्था, संघटनांनी केले आहे. शहरात दोन ठिकाणी 1 जानेवारी रोजी रक्तदान शिबिर होणार आहे. एका ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर देखील आयोजित केले आहे. काहींनी 31 रोजी रात्री 12 वाजता केक कापून नववर्ष साजरे करण्याचा संकल्प देखील केला आहे.पोलिसांतर्फे सतर्कतानववर्षाच स्वागताच्या नावाखाली मद्य पिऊन धिंगाणा घालणे, भरधाव वाहने चालविणे असे प्रकार होतात. त्यातून अपघात देखील होतात. ही बाब लक्षात घेता पोलीस विभागातर्फे यावर्षी पोलिसांतर्फे सतर्कता ठेवण्यात आली आहे. 31 डिसेंबरच्या रात्री आणि 1 जानेवारीच्या उत्तररात्री मद्य पिऊन वाहन चालविणे, वेगात वाहन चालविणे, मोठय़ाने हॉर्न वाजवत ध्वनीप्रदुषण करणे आदी प्रकार होतात. यामुळे अपघात होऊन अनेकांना जायबंदी व्हावे लागते, आपला जीव गमवावा लागतो. ही बाब लक्षात घेता या घटनांना प्रतिबंध बसावा यासाठी जिल्हा पोलीस दल आणि शहर वाहतूक शाखेतर्फे रविवारी रात्री दहा ते सोमवारी पहाटे चार वाजेर्पयत विशेष नाकाबंदी मोहिम राबविण्यात येणार आहे. त्यात शहराला जोडणा:या प्रमुख रस्त्यांवर तसेच प्रमुख चौकांवर नाकाबंदी दरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांची तपासणी करण्यात येणार असून ब्रेथ अॅनालायझरने मद्याचे सेवन करून वाहन चालविणा:या चालकांची पडताळणी करण्यात येऊन चालक दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे जनतेने, वाहनचालकांनी  मद्याचे सेवन करून वाहन न चालविता कुठल्याही प्रकारचा अपघात, गैरकृत्य व कायदेशीर कार्यवाहीपासून दूर राहावे असे आवाहन पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी केले आहे.