लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 13 : गेल्या अनेक दिवसांपासून नंदुरबार आगारात साधारणत 15 ते 20 बसेस ‘स्पेअर पार्ट’अभावी पडून असल्याची माहिती आह़े त्याच प्रमाणे अनेक बसेस्ची देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक असतानाही त्या तशाच चालविण्यात येत आह़े त्यामुळे साहजिकच देखभाल दुरुस्तीअभावी बसेस् अधिक खिळखिळ्या होत आहेत़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार आगारातील बसेस् अनेक दिवसांपासून टायर उपलब्ध होत नसल्याने पडून आहेत़़ या बसेस चालविण्यास योग्य नसल्याने वाहनचालकांकडून दुरुस्तीची मागणीही करण्यात येत आह़े त्याच प्रमाणे धुळे डेपोमधूनही बसेस्चे ‘स्पअेर पार्ट’ मिळण्यास उशिर होत असल्याचे सांगण्यात आले आह़े आधीच उन्हाळा आह़े त्यात बसेसची टायर तसेच बॅटरींना मोठय़ा प्रमाणात समस्या निर्माण होत असत़े उन्हामुळे बॅट:या जळण्याच्या घटनाही नाकारता येत नाहीत़ त्यामुळे बसेसची वेळेवर देखभाल दुरुस्ती होणे अपेक्षीत असत़े याबाबत आगारप्रमुख नीलेश गावीत यांना विचारले असता एकूण 105 शेडय़ूल असून 128 बसेस आगारात असल्याचे त्यांनी सांगितल़े परंतु बसेसची संख्या जरी जास्त असली तरी त्यातील बहुतेक बसेसची स्थिती अत्यंत खिळखिळी झाली आह़े अनेक बसेच्या खिडक्यांचीही दुरावस्था झाली आह़े त्यामुळे बसेसच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च करणे महत्वाचे आह़े एसटीच्या उत्पन्नातून देखभाल दुरुस्तीचा खर्च करण्यात येत असतो़ परंतु तरीदेखील याकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात येत असत़े याकडे धुळे डेपोनेही लक्ष देण्याची आवश्यकता आह़े
नंदुरबारातील एसटी बसेस ‘स्पेअर पार्ट’अभावी पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 1:21 PM