लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सकाळपासूनच साफसफाईसाठी गणवेशात असलेले डजनभर सफाई कर्मचारी, प्रत्येकाच्या हातात ग्लॉज व प्लॅटफार्म साफ करण्यासाठीची अत्याधुनिक मशिन्स, बसण्यासाठी चकचकीत आसनव्यवस्था, पिण्यासाठी मिनरल वॉटर्सच्या बाटल्या तसेच ताक, लस्सी आदींचे स्टॉल्र्स हे चित्र कुठल्या फाईव्ह स्टार हॉटेल किंवा मल्टीनॅशनल कंपनीतील नव्हे तर नंदुरबार येथील रेल्वे स्थानकावर गुरुवारी दिसून आल़े निमित्त होते ते मंडल रेल प्रबंधक (डीआरएम) मुकूल जैन यांच्या पाहणी दौ:याच़ेरेल्वे स्थानकावर प्रवाशांना गुरुवारी ‘राजा बोले दल हाले’ या म्हणीचा प्रत्येय आला़ नंदुरबार रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यासाठी ‘डीआरएम’ मुकूल जैन येणार म्हणून सकाळपासूनच अधिकारी वर्गाची लगबग सुरु झाली होती़ त्यामुळे अवघ्या काही तासातच रेल्वे स्थानक चकाचक करण्यात आल़ेयाबाबत सविस्तर वृत्त असे की, गुरुवारी मंडल रेल प्रबंधक मुकूल जैन यांनी नंदुरबार रेल्वे स्थानकाचे सव्रेक्षण केल़े यात पाण्याची सुविधा, शौचालयाच्या सोयी, रेल्वे कर्मचा:यांची निवासस्थाने, रेल्वे रुग्णालय, स्थानकावरील प्रतिक्षालय तसेच रेल्वे रुळ आदींची पाहणी करण्यात आली़ दरम्यान, पहिल्या भेटीत त्यांनी साफ-सफाईच्या कामांबाबत समाधान व्यक्त केले असले तरी, शौचालयाच्या सोयीसुविधांबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आह़े रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्ऱ दोन व तीन वरील शौचालयांबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करत यात तत्काळ सुधारणा करण्याच्या सुचना संबंधित अधिका:यांना दिल्या़ तसेच प्लॅटफार्म क्ऱ एकवरही शौचालय ब्लॉक होण्याची समस्या जाणवत असल्याचे या वेळी आढळून आल़े पोलीस कर्मचारीही झाले हजर..जैन यांचा पाहणी दौरा असल्याची खबर रेल्वेस्थानकावर नियुक्त करण्यात आलेल्या पोलीस कर्मचा:यांना मिळताच पटापट पोलीस कर्मचारी रेल्वे स्थानकावर दाखल झाल़े ऐरवी पोलीस कर्मचा:यांच्या आसनाच्या ठिकाणी मोकाट जनावरे बसत असल्याने आज चक्क त्या ठिकाणी स्थानकावर नियुक्त करण्यात आलेले पोलीस कर्मचारी दिसून आल्याने प्रवाशांनाही सुखद धक्काच यानिमित्ताने बसला़
‘डीआरएम’ येताच नंदुरबार स्थानक चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:11 PM
नंदुरबार रेल्वे स्थानकाची पाहणी : सकाळपासूनच अधिकारी, कर्मचारी लागलेत कामाला
ठळक मुद्देपाहणी दौ:याने धावपळ. डीआरएम मुकूल जैन यांच्या पाहणी दौ:यांची माहिती मिळताय स्थानक अधिका:यांमध्ये एकच धावपळ उडाली़ रात्री या पाहणी दौ:याची माहिती मिळाल्यावर एका रात्रीत संपूर्ण रेल्वे स्थानक परिसराची साफसफाई करण्यात आल्याची माहिती मिळाली़ त्याच प्रमाणे गुर