आॅनलाईन लोकमतनंदुरबार,दि.२० : खाजगी कोचिंग क्लासमध्ये शिकवणीसाठी येणा:या 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग करणा:या शिक्षकाविरोधात रविवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला़ एप्रिल महिन्यापासून शिक्षक विद्यार्थिनीची वारंवार छेड काढत होता़ त्याला कंटाळून मुलीने फिर्याद दिली. दरम्यान, पालकांनी शिक्षकाला चांगलाच चोप दिला.
शहरात श्रीराम कोचिंग क्लासेस या नावाने खाजगी शिकवणी वर्ग चालविला जातो. या क्लासमध्ये दहावीत शिकणारी 16 वर्षीय विद्यार्थीनी देखील येते. या क्लासचा संचालक आशिष वाणी याने तिची शनिवारी सायंकाळी छेड काढत तिला लज्जा येईल असे कृत्य केल़े प्रकार सहन न झाल्याने बालिकेने घराकडे धाव घेतली़ घरी गेल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. संबधित शिक्षक हे एप्रिल महिन्यापासून छेडखानी करत असल्याचा प्रकार कथन केला़ मात्र सायंकाळ झाल्याने पालकांनी रविवारी सकाळी क्लासमध्ये जाऊन क्लासचालक वाणी याला जाब विचारला, याठिकाणी वाणी याने पालकांसोबत अरेरावी करण्याचा प्रयत्न केल्याने संतप्त पालकांनी त्याला तेथेच चोप दिला. शहर पोलीस ठाण्यात आणत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. यासंदर्भात बालिकेने दिलेल्या फिर्यादीवरून आशिष वाणी याच्याविरोधात बाल लंैेगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस उपनिरीक्षक गितांजली सानप करत आहेत़ या प्रकारामुळे पालकांमध्ये एकच खळबळ उडाली असून दुपारी शहर पोलीस ठाण्याबाहेर पालकांनी एकच गर्दी केली होती़ शहरात ही माहिती वा:यासारखी पसरल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत होता.